SEAS- State Educational Achievement Survey 2023 KARNATAKA राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण
PARAKH – Performance Assessment, Review, and Analysis of Knowledge for Holistic Development
NCERT- PARAKH यांचेकडून दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी कर्नाटक राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये इयत्ता 3री, 6वी व 9वी मधील विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS- State Educational Achievement Survey ) 2023 आयोजित करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली यांनी सदर उपक्रमाचे खालील वेळापत्रकाप्रमाणे नियोजन केले आहे.
NCERT-PARAKH नवी दिल्लीच्या वतीने निवडलेल्या राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता 3,6 आणि 9 मध्ये शिकणाऱ्या कमाल 30 विद्यार्थ्यांसाठी (प्रति इयत्ता कमाल 30 विद्यार्थी) 03.11.2023 रोजी K.S.Q.A.A.C. यांचेकडून राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS- State Educational Achievement Survey ) 2023 आयोजित
व्याप्ती :-
राज्यातील निवडक सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता 3,6 आणि 9 मधील निवडक विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणे.
माध्यम:- कन्नड, इंग्रजी, हिंदी, उर्दू, मराठी, तमिळ, तेलगू.
सर्वेक्षणाचे विषय,तपशील,गुण वितरण आणि वेळ:-
इयत्ता – 3री
विषय – मराठी,गणित
गुण – 40
वेळ – 60 मिनीटे
इयत्ता – 6वी
विषय – मराठी,गणित
गुण – 50
वेळ – 75 मिनीटे
इयत्ता – 9वी
विषय – मराठी,गणित
गुण – 60
वेळ – 90 मिनीटे
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप :-
भाषा व गणित विषयांचे बहुपर्यायी प्रश्न असलेली एक प्रश्नपत्रिका पुस्तिका असेल
इयत्ता 3री :- इयत्ता 3री साठी 31, 32, 33 आवृत्तीच्या प्रश्नपत्रिका पुस्तिका असतील.या पुस्तिकांमध्ये भाषा आणि गणित या दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी 20 प्रश्नांसह एकूण 40 प्रश्न आहेत.
इयत्ता 6वी :- इयत्ता 6 साठी 61, 62, 63 या प्रश्नपत्रिका पुस्तिकेच्या 3 आवृत्ती असतील. पुस्तिकांमध्ये भाषा आणि गणित या दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी 25 प्रश्नांसह एकूण 50 प्रश्न आहेत.
इयत्ता 9वी :- इयत्ता 9वी साठी 91, 92, 93, 94 अशा प्रश्नपत्रिकेच्या 4 आवृत्ती पुस्तिका आहेत.या पुस्तिकांमध्ये भाषा आणि गणित या दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी 30 प्रश्नांसह एकूण 60 प्रश्न आहेत.
OMR (उत्तरपत्रिका)
इयत्ता 3री साठी:-
3री वर्गातील विद्यार्थी प्रश्नपत्रिकेच्या पुस्तिकेत गोल करून उत्तर चिन्हांकित करतील.(OMR मध्ये विद्यार्थ्यांनी कोणतेही उत्तर चिन्हांकित
करू नये).
फील्ड इन्व्हेस्टिगेटर (पर्यवेक्षक) यांनी 3रीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका पुस्तिकेत चिन्हांकित करून निवडलेली उत्तरे OMR मध्ये छायांकित करणे.
OMR नमुना –
इयत्ता 6 आणि 9 साठी:-
6वी आणि 9वी वर्गातील विद्यार्थी त्यांची उत्तरे OMRमध्ये शेड करतात.
प्रश्नपत्रिका :- सर्वेक्षणाच्या कामासाठी तीन प्रकारच्या प्रश्नावली दिल्या आहेत.
विद्यार्थी प्रश्नावली (Pupil Questionnaire – PQ)
शिक्षक प्रश्नावली(Teacher Questionnaire-TQ)
शालेय प्रश्नावली(School Questionnaire-SQ)
इयत्ता 8वी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका
या सर्वेक्षणासंबंधी अधिकृत आदेश व मार्गदर्शक तत्वे खालील पीडीएफ डाऊनलोड करा.