SSLC / PUC II ANNUAL EXAM 2023-24 IMPORTANT POINTS

SSLC आणि PUC द्वितीय वर्ष परीक्षा वार्षिक परीक्षा 2023-24
SSLC / PUC II ANNUAL EXAM 2023-24 IMPORTANT POINTS 
imageedit 3 3284424074
2023-24 शैक्षणिक वर्षांपासून SSLC आणि PUC द्वितीय वर्ष परीक्षा वार्षिक परीक्षा-1,2 आणि 3 या नावाने तीन संधी विद्यार्थ्यांना देणेबाबत….

    सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक वार्षिक परीक्षा आणि एक पुरवणी परीक्षा घेतली जाते.परीक्षेच्या या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर अधिक ताण आणि परीक्षेची चिंता निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ज्ञानधारणा,अर्थपूर्ण अध्ययन आणि शैक्षणिक प्रगतीला खीळ बसत आहे.

            सध्याच्या PUC II परीक्षेत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी प्राप्त गुणांवर समाधानी नसल्यास,वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण नाकारण्याचा पर्याय आहे.पण मागील परीक्षेत मिळालेले गुण विचारात न घेता पुरवणी परीक्षेतील मिळालेले गुण अंतिम गुण मानले जातात.ही पद्धत विद्यार्थीस्नेही नाही,कारण विद्यार्थ्याला दोन्ही परीक्षांमध्ये आपले सर्वोत्तम गुण टिकवून ठेवण्याचा पर्याय नाही.जर आपण सुधारित पद्धतीचा अवलंब केला तर ती 1, 2 आणि 3 परीक्षांमध्ये मिळालेले सर्वोत्तम गुण टिकवून ठेवण्याची संधी देईल आणि पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीमध्ये निवड प्रक्रियेत चांगली संधी मिळू शकेल.
           प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययनाचा वेग आणि पद्धती वेगवेगळी असते.जर 1,2,3 परीक्षा घेतल्या तर त्यांच्या अध्ययनाच्या वेगाशी जुळवून घेण्यास मदत होईल आणि विद्यार्थी शिकत असताना वेळेच्या मर्यादांचा दबाव कमी होईल.
          “पुरवणी परीक्षा” या नावाऐवजी “वार्षिक परीक्षा 1,2आणि 3” अशा नावांनी तीन संधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांची एकूण कार्यक्षमता आणि सकारात्मक वृत्तीला
प्रोत्साहन देण्यासाठी तीन संधी उपलब्ध करून द्याव्यात.अशी शिफारस कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने केली आहे.

कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने खालील मार्गदर्शक तत्त्वांनुसार चाचण्या घेण्याचा प्रस्ताव केला आहे.


1.सर्व SSLC आणि PUC 2 वार्षिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना वर्गातील 75% वार्षिक हजेरी आवश्यक असेल.75% पेक्षा कमी वार्षिक हजेरी असणारे विद्यार्थी परीक्षेस पात्र असणार नाहीत.

2.प्रथम परीक्षा देणारे विद्यार्थी आणि खाजगी विद्यार्थी यांनी परीक्षा -1 देणे अनिवार्य असेल. परीक्षा -1 न देता थेट परीक्षा-2 व परीक्षा-3 देता येणार नाही.
3.विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्याच्या संदर्भात प्रत्येक महाविद्यालयाला भेट देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची हजेरी व नोंदणी तपासण्यासाठी जिल्हा उपनिर्देशक यांचेकडून आवश्यक तपास पथक रचण्यात येईल.

4. SSLC आणि माध्यमिक PUC परीक्षा उत्तीर्ण
विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यासाठी एकच वेळ शुल्क (फी.) आकारणी करावी.दुसऱ्यांदा शुल्क वसूली करू नये.

5. परीक्षा-1 उत्तीर्ण झालेल्या आणि 2री आणि 3री परीक्षा देण्यास इच्छुक नसलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

6. विद्यार्थ्यांचे गुण नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी (NAD) डिजी लॉकर प्रणालीमध्ये संबंधित परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अपलोड करणे.

7. SSLC आणि माध्यमिक PUC परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि पुन्हा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सद्याची परीक्षा प्रणाली चालू ठेवणे.

2023-24 पासून लागू होणाऱ्या SSLC व PUC द्वितीय वर्ष वार्षिक परीक्षा आयोजित करण्याच्या

वरील प्रस्तावाचे पुनरावलोकन केल्यानंतर शासनाने आदेश क्रमांक EP 203 SLB 2023, दिनांक: 21.09-2023 खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

प्रस्तावात स्पष्ट केलेल्या पार्श्वभूमीवर सरकारने पुढील मार्गदर्शक तत्वानुसार
2023-24 वर्षापासून कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळामार्फत SSLC व PUC द्वितीय वर्ष वार्षिक परीक्षा 1,2आणि 3” अशा नावांनी घेण्यास मान्यता दिली आहे.

2023-24 वर्षापासून SSLC व PUC द्वितीय वर्ष वार्षिक परीक्षा 1,2आणि 3 साठी खालील मुद्दे महत्वाचे आहेत. 
1. SSLC आणि PUC-2 वार्षिक परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्गात 75% वार्षिक उपस्थिती अनिवार्य आहे.ज्यांची उपस्थिती 75% पेक्षा कमी असेल त्यांना परीक्षा लिहिता येणार नाही.

2. प्रथमच परीक्षा देणाऱ्या फ्रेशर्स आणि खाजगी उमेदवारांना सर्व विषयांची परीक्षा लिहिणे अनिवार्य आहे. परीक्षा-2 आणि परीक्षा-3 साठी थेट परीक्षा देऊ शकत नाही.

3. विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्याच्या संदर्भात प्रत्येक महाविद्यालयाला भेट देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची हजेरी व नोंदणी तपासण्यासाठी जिल्हा उपनिर्देशक यांचेकडून आवश्यक तपास पथक रचण्यात येईल.

4. SSLC आणि माध्यमिक PUC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यासाठी एकच वेळ शुल्क (फी.) आकारणी करावी.दुसऱ्यांदा शुल्क वसूली करू नये.

5. परीक्षा-1 उत्तीर्ण झालेल्या आणि 2री आणि 3री परीक्षा देण्यास इच्छुक नसलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

6. विद्यार्थ्यांचे गुण नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी (NAD) डिजी लॉकर प्रणालीमध्ये संबंधित परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अपलोड करणे.

7. SSLC आणि माध्यमिक PUC परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि पुन्हा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सद्याची परीक्षा पद्धत चालू ठेवणे.


CLICK HERE FOR CIRCULAR – CLICK HERE
परीक्षा मंडळाचे संभवनीय परीक्षा वेळापत्रक -: 
इयत्ता – 12वी (PUC II) 
परीक्षा – 1   1 मार्च ते 25 मार्च   निकाल –22 एप्रिल  पुनर्मुल्यांकन निकाल – 10 मे 

परीक्षा – 2  25 मे ते 5 जून      निकाल – 21 जून     पुनर्मुल्यांकन निकाल – 29 जून  

परीक्षा- 3  12 जुलै ते 30 जुलै  निकाल – 16 ऑगस्ट     पुनर्मुल्यांकन निकाल 25 ऑगस्ट

इयत्ता – 10वी (SSLC) 
परीक्षा – 1   30 मार्च ते 15 एप्रिल   निकाल –8 मे  पुनर्मुल्यांकन निकाल – 23 मे 

परीक्षा – 2  12 जून ते 19 जून      निकाल – 29 जून     पुनर्मुल्यांकन निकाल 10 जुलै  

परीक्षा- 3  29 जुलै ते 05 ऑगस्ट  निकाल – 19 ऑगस्ट  पुनर्मुल्यांकन निकाल 26 ऑगस्ट

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *