INDEPENDENCE DAY MARATHI SPEECH स्वातंत्र्य दिन मराठी भाषण

 

 

INDEPENDENCE DAY MARATHI SPEECH 

स्वातंत्र्य दिन भाषण



        आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन गावातील प्रतिष्ठित नागरिक माझ्या बाल मित्रांनोसर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
       आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले आपल्यासाठी 1947
हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय.
माणूस असो वा देश असो स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही.हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. या सर्व देशभक्तांचे मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य!
         इंग्रजांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले.जुलूम दडपशाही अन्याय अत्याचार यामुळे भारतीय जनता दुःखाने होरपळून निघाली.पंडित नेहरू,
सावरकर,महात्मा गांधीजी,सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक,चंद्रशेखर आजाद,भगतसिंग राजगुरू अशा कितीतरी नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.कित्येक क्रांतिकारक फासावर चढले तर अनेकांनी आपली सर्व हयात तुरुंगवासात घालवली.अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळाले आहे.

    भारताचे स्वातंत्र्य टिकवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. आजच्या दिवशी या महान देशभक्तांचे स्मरण करून त्यांच्या स्वप्नातील भारत देश निर्माण करण्यासाठी सर्वांनी निश्चय करून देश हितासाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार करूया.देशासाठी प्राण पणाला लावलेल्या क्रांतीविरांना शतशः प्रणाम

          जय हिंदजय भारत


वरील संपूर्ण भाषण PDF मध्ये डाऊनलोड करा.

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *