कर्नाटक सरकार
गृह ज्योती योजना
गृह ज्योती योजना ही कर्नाटक सरकारच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असलेली योजना आहे. पात्र वीज ग्राहकांना मोफत वीज पुरवून,ही योजना सकारात्मक बदलासाठी, कुटुंबांना सक्षम बनवण्यासाठी, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी आणि शाश्वत भविष्यासाठी योगदान देणारी ठरली आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट 2023 पासून होणार असून यासंबंधी आपल्या प्रश्नांची उत्तरे येथे आहेत..
आपल्याला पडलेले प्रश्न
1. मी या योजनेसाठी पात्र आहे का?
कर्नाटक राज्यातील सर्व घरगुती ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत.
2. गृह ज्योती योजना काय आहे?
“गृह ज्योती” ही कर्नाटक सरकारची एक प्रमुख योजना आहे जी कर्नाटकातील प्रत्येक घरातील ग्राहकांना 200 युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवते.
3. ही योजना मिळविण्यासाठी मला काय करावे लागेल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक घरगुती ग्राहकाला सेवासिंधू (SevaSindhu) वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल.त्याची लिंक लवकरच शेअर केली जाईल, नोंदणी जून-15 पासून सुरू होईल.
4. ही योजना कधीपासून लागू होणार?
जुलै 2023 मधील वीज वापरावर आधारित ऑगस्ट 2023 मध्ये काढलेल्या बिलासाठी ही योजना लागू केली जाईल.
5. मला ही योजना कशी आणि कुठे मिळेल?
ही योजना मिळविण्यासाठी कर्नाटक सरकारच्या सेवासिंधू (SevaSindhu) वेबसाइटवर अर्ज करा.त्याची लिंक लवकरच दिली जाईल, 15 जूनपासून नोंदणी सुरू होईल.
6. मला ही योजना प्रत्यक्ष अर्जाद्वारे (ऑफलाइन) मिळू शकते का?
होय,सर्व घरगुती ग्राहकांना Gram One, Karnataka One आणि Banglore One केंद्राद्वारे अर्ज करण्याची परवानगी असेल.
7. ही योजना मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील?
आधार क्रमांक
ग्राहक क्रमांक/खाते क्रमांक
(भाडेकरू असल्यास) भाडेकरार पत्र
किंवा
संबंधित पत्ता दर्शविणारे मतदान ओळखपत्र.
8. अर्ज करताना मला फी भरावी लागेल का?
या योजने अंतर्गत अर्ज करण्यास सेवासिंधू पोर्टलवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
9. मला जून महिन्याचे वीज बिल भरावे लागेल का?
होय. ही योजना जुलै 2023 च्या वीज वापरासाठी लागू होईल. 1 ऑगस्ट 2023 आणि त्यानंतरच्या मीटर रीडिंग तारखांपासून लागू राहील.
10. माझ्याकडे एकापेक्षा जास्त वीज मीटर असल्यास, मी या योजनेसाठी पात्र आहे का?
नाही.प्रत्येक ग्राहक केवळ एका मीटरच्या योजनेसाठी पात्र आहे.
11.अर्ज केल्यानंतर मला काही पोचपावती मिळेल का?
होय,सेवासिंधूकडून ग्राहकांना ईमेल/SMS द्वारे नोंदणीकृत संदेश पाठविला जाईल.
12. मी या योजनेसाठी आधीच अर्ज केला आहे, योजनेचा लाभ माझ्या खात्यात कधी जमा होण्यास सुरुवात होईल?
जुलै 2023 मध्ये जारी केलेल्या बिलास ही योजना लागू नाही.योजनेचे फायदे मीटर रीडिंगच्या तारखेपासून म्हणजे 1 ऑगस्ट 2023 किंवा त्यानंतरच्या तारखेपासून लागू होतात.(जुलै-2023 मधील वीज वापरासाठी)
13. मी अपार्टमेंट मालक आहे,मी या योजनेसाठी अर्ज करू शकतो का?
होय,वैयक्तिक वीज मीटर उपलब्ध असल्यास/स्थापित असल्यास योजनेसाठी अर्ज केला जाऊ शकतो.
14. मी भाडेकरू आहे; बिल मालकाच्या नावावर आहे, मला योजना लागू होईल का?
होय,आधार क्रमांक,बिलामध्ये नमूद केलेला ग्राहक क्रमांक/खाते क्रमांक,भाडे करार पत्र किंवा संबंधित पत्ता दर्शविणारे मतदार ओळख पत्र सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
15. योजनेंतर्गत भाडेकरू म्हणून नोंदणीसाठी सादर करावयाची कागदपत्रे काय आहेत?
भाडेकरू पत्त्याच्या पुराव्यासह नोंदणी करू शकतात आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार सोबत भाडे करार पत्र सादर करू शकता.
16. मी 2 महिन्यांपूर्वी घर बदलले आहे, मला लाभ मिळेल का?
होय,नवीन कनेक्शनचे नियम लवकरच प्रकाशित केले जातील.
17. मी एक दुकान मालक आहे,मी देखील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो का?
नाही, ही योजना फक्त घरगुती वीज वापरकर्त्यांसाठी लागू आहे.
18. मला किती युनिट मोफत वीज मिळेल?मी दरमहा 200 युनिट्ससाठी पात्र आहे का?
2022-23 मधील सरासरी वीज वापर + 10% वाढ (एकूण 200 युनिट पेक्षा कमी असावे) च्या आधारावर लाभार्थ्यांची गणना केली जाईल.
19.मला वीज बिल खाते क्रमांक कुठे मिळेल?
वीज बिल खाते क्रमांक प्रत्येक महिन्याच्या वीज बिलामध्ये उपलब्ध आहे.
20.या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते क्रमांकाशी आधार लिंक करणे अनिवार्य आहे का?
होय,ग्राहक क्रमांक/खाते क्रमांकाशी आधार लिंक करणे अनिवार्य आहे.
21. माझे आधार कर्नाटकाबाहेर नोंदणीकृत आहे.मला ही योजना मिळू शकते का?
होय,जर तुम्ही कर्नाटकच्या पत्त्याच्या पुराव्यासह कर्नाटकात कुठेही रहात असाल तर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात.
22. माझ्याकडे वीज बिल थकबाकी असल्यास,मी या योजनेसाठी पात्र आहे का?
होय,परंतु 30 जूनपर्यंतची थकीत वीज बिल रक्कम 3 महिन्यांत भरली पाहिजे,अन्यथा वीज कनेक्शन खंडित केले जाईल.
23. मला समजते की,जर मी या योजनेचा लाभार्थी म्हणून मला वाटप केलेल्या मोफत विजेपेक्षा जास्त युनिट वापरत असलो,तर मला त्या अतिरिक्त युनिट्ससाठी पैसे द्यावे लागतील.परंतु, ते जास्त युनिट वापराचे बिल न भरल्यास, मला या योजनेतून अपात्र ठरवले जाईल का?
नाही,थकबाकी न भरल्यास वीज खंडित केली जाईल. शिल्लक रक्कम भरल्यानंतर पुन्हा या योजनेचा लाभ घेता येईल.
24. वीज बिल माझ्या दिवंगत वडिलांच्या नावावर आहे? मी यासाठी अर्ज कसा करू शकतो?
वीज जोडणी तुमच्या नावावर हस्तांतरित करावी आणि त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करावा.सर्व उपविभागातील जनस्नेही वीज सेवा काउंटरच्या नावात बदल केले जातील.
25. जर माझा मासिक वापर 200 युनिटपेक्षा जास्त असेल तर मी बिलाची संपूर्ण रक्कम भरावी का?
होय,तुम्हाला त्या विशिष्ट महिन्यासाठी संपूर्ण बिलाची रक्कम भरावी लागेल.
26. जर माझा वीज वापर मोफत युनिटपेक्षा कमी असेल तर बिलाची रक्कम किती असेल?
विजेचा वापर पात्र युनिटपेक्षा कमी असल्यास तुम्हाला ‘झिरो रुपयांचे बिल’ मिळेल.
SEVESINDHU PORTAL – CLICK HERE
वरील उत्तरांची PDF डाऊनलोड करा.. Click Here