World Environment Day: Protecting the Earth for a Safe Future 5 जून जागतिक पर्यावरण दिन 
5 जून जागतिक पर्यावरण दिन: पृथ्वीचे संरक्षण सुरक्षित भविष्यासाठी
“World Environment Day: Protecting the Earth for a Safe Future.”

 

World Environment Day: Protecting the Earth for a Safe Future 5 जून जागतिक पर्यावरण दिन 

         झाडे,पाणी,पक्षी,फुले,फळे,माती,रंग,अन्न इत्यादी सर्व आवश्यक गोष्टी आपल्याला निसर्गाकडून सहजासहजी मिळतात यांचाच वापर करून आपण आपली तहान भूक भागवतो,अनेक सण समारंभ साजरे करतो,आनंद लुटतो पण आपण आपल्या स्वार्थासाठी

ज्या निसर्गाकडून आपल्याला आवश्यक गोष्टी मिळतात त्याच निसर्गातील झाडे तोडत आहोत,निसर्गात प्रदूषण करत आहोत त्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडून भविष्यात पृथ्वीवरील सजीवांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते.म्हणून आज 
पर्यावरणाचे रक्षण,जगाची सुरक्षा,
पर्यावरण वाढवा – वसुंधरा वाचवा 
अशा घोषणा देण्याची वेळ आपल्यावर आली आहे.


 
      पर्यावरण संरक्षण ही आजची गरज ओळखून 1972 साली संयुक्त राष्ट्र महासभेने 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित केला आहे.म्हणून दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आपल्या ग्रहाच्या संरक्षणासाठी हा संयुक्त राष्ट्रांचा (UN) एक उपक्रम आहे.पहिला जागतिक पर्यावरण दिन 1974 मध्ये आयोजित करण्यात आला होता. 

    जागतिक पर्यावरण दिन जगभरात विविध प्रकारे साजरा केला जातो.सरकार, संस्था, शाळा आणि व्यक्ती वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता मोहीम, पर्यावरण शिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रे आणि प्रदर्शने यासारखे कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करतात.पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे आणि लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात पर्यावरणदायक कृती करण्यास प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देश आहे.
जागतिक पर्यावरण दिन साजरा करून,वृक्षतोड,प्रदूषण यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या प्रभावांचा लोकांनी विचार करावा व नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण जतन करण्यासाठी,जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आणि कायमस्वरूपी उपायांना करण्यासाठी प्रोत्साहित करता येते.प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणाचे महत्व पटवून देणे व पर्यावरण संरक्षण करण्याची भावना निर्माण करणे यामध्ये पर्यावरण दिन महत्वाची भूमिका बजावतो.
पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी आता आपल्यावर आहे.यासाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण होईल असे वागले पाहिजे.
झाडे लावणे,कचरा कमी करणे,पाणी वाचवणे,प्लास्टिकचा वापर टाळणे,पुनर्भवी ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे,विजेची बचत करणे यासारखे उपक्रम राबवले पाहिजेत.सर्व धर्मातील लोकांनी आपले सण पर्यावरणपूरक कसे साजरे करता येतील यावर उपाययोजना केल्या पाहिजेत.
        पर्यावरण संरक्षक कृतीचा अवलंब केला तरच आपली पृथ्वी वाचेल आणि आपले भविष्य आरोग्यदायी असेल अन्यथा- 
कचऱ्याची दुर्गंधी येईल,प्लास्टिकची लाट वाहील.

 

सर्वत्र रोगराई येईल,दारिद्र्याची साथ पसरेल
प्रदूषणाने घात होईल,भूमाता आपली लयाला जाईल

 

आणि पृथ्वीवर आपले जगणे अशक्य होईल.. असा इशारा पर्यावरण तज्ञांनी दिलेला आहे.म्हणून लक्षात ठेवा. –
वृक्ष लावा घरोघरी पर्यावरण राखा जीवनी पर्यावरण जागवा.
वसुंधरा वाचवा दारी वृक्षाचा पहारा पशुपक्ष्यांना देऊ आसरा. 
उन्हातान्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली.
पुढच्या पिढीसाठी करू आसरा, फळांच्या बिया पर्यावरणात पसरा.
ना वृक्ष तोड, ना गलत मोड, ना करो पर्यावरण की हानी, फिर कहो दिल है हिंदुस्तानी..


Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *