Karnataka SSLC Result 2023: Check Your 10th Class Results Here कर्नाटक एसएसएलसी परीक्षा निकाल:अपडेट्स

 


कर्नाटक SSLC निकाल पाहण्यासाठी Direct link शेवटी देण्यात आली आहे.



परीक्षा बोर्ड

Karnataka School Examination and Assessment Board [KSEAAB]

परीक्षा

SSLC Board Exam


राज्य


कर्नाटक


परीक्षा दिनांक


31 मार्च ते 15 एप्रिल 2023


एकूण परीक्षार्थी


 8.5 लाख


निकाल पद्धत


 Online


निकाल दिनांक


 08 मे 2023

निकाल website

karresults.nic.in




 

     कर्नाटक शाळा परीक्षा आणि मुल्यांकन मंडळ (Karnataka School Examination and Assessment Board) बेंगळुरू यांच्या वतीने SSLC परीक्षा 2023 आयोजित करण्यात आली होती.SSLC परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.SSLC परीक्षेचा निकाल इयत्ता 11 वी च्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो.कारण बहुतांश महाविद्यालये आणि शाळा या गुणांचा वापर निवडीसाठी करतात. शिष्यवृत्ती आणि इतर आर्थिक मदत मिळवण्यासाठी SSLC परीक्षेत चांगले गुण मिळवणे देखील महत्त्वाचे आहे. म्हणूनच SSLC विद्यार्थ्यांची या परीक्षेच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते.
    


            पण आता ही उत्कंठा संपणार असून KSEAAB बेंगळुरू यांचेकडून निकालाची तारीख घोषित करण्यात आली आहे. KSEAAB बेंगळुरू यांच्यावतीने यावर्षी 31.03.2023 ते 15.04.2023 या कालावधीत SSLC वार्षिक घेण्यात आली आहे.या परीक्षेचा निकाल सर्वसाधारणपणे मे च्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरू होती.तर कांहीं वृत्तपत्रकातून 11 किंवा 12 मे रोजी निकाल जाहीर होणार असल्याची बातमी होती.
पण 06.05.2023 रोजी
KSEAAB कडून सदर निकालाची तारीख अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.त्यानुसार आता SSLC परीक्षा 2023 चा निकाल 08.05.2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जाहीर होणार असून सकाळी 11.00 पासून विद्यार्थ्याना परीक्षा मंडळाच्या वेबसाईट वर निकाल पाहण्यास उपलब्ध असेल.



 

दि. 08.05.2023 रोजी सकाळी 11.00 नंतर विद्यार्थी त्यांचे एसएसएलसी निकाल KSEEB च्या अधिकृत वेबसाईट – karresults.nic.in वर पाहू शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांचे निकाल तपासण्यासाठी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
SSLC परीक्षेच्या निकालांमध्ये विद्यार्थ्याचे नाव,रोल नंबर, प्रत्येक विषयात मिळालेले गुण आणि एकूण मिळालेले गुण यांचा समावेश असेल.निकाल विद्यार्थ्याची पास/नापास स्थिती आणि त्यांची एकूण टक्केवारी देखील दर्शवेल.
विद्यार्थ्यांनी हे ही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की,SSLC परीक्षेचा निकाल तात्पुरताअसतो आणि तो बदकु शकतो. बदलू शकतात. जे विद्यार्थी त्यांच्या निकालांवर समाधानी नाहीत ते त्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्संचयित करण्यासाठी अर्ज करू शकतात. KSEEB विद्यार्थ्यांना ही सुविधा पुरवते आणि त्यांनी विहित मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.


DIRECT RESULT LINKS  





Click Here to check SSLC RESULT –



Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *