Ambedkar Jayanti Speech in Marathi

भारत रत्न डॉ. बी.आर.आंबेडकर जयंती 
मराठी भाषण  


 
Ambedkar Jayanti Speech in Marathi

 आभाळ मोजतो आज आम्ही

भिमा तुझ्या मुळे…
वादळही रोखतो आम्ही आज
भिमा तुझ्या मुळे….
बंदूक, तोफा, शास्त्र, साठा…
याची आम्हाला गरजच नाही;
कारण शब्दानेच रान पेटवतो आम्ही
भिमा तुझ्या मुळे….

              डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण,संघटन,संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो
वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या काही लोटले गेलेल्या लाखो दलित पीडितांचे
पूनरुत्थान करणारे महामानव होते.

              कोणत्याही व्यक्तीचे विचार कायम त्याच्यामागे राहतात
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
,कार्य त्यांनी समता,बंधुता,लोकशाही,स्वातंत्र्य,जागतिक अर्थकारण,राजकारण याविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात.त्यांचे
कार्य आजही स्फूर्तीदायी
,प्रेरणादायी व परिणामकारक आहे. भारतातील अस्पृश्यता
निवारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न एक लेखक
,एक समाजसेवक,एक राजकारणी व एक माणूस म्हणून त्यांचे कार्य व योगदानाला
जगात तोड नाही.

      अद्वितीय बुद्धिमत्ता त्या आधारे स्वतः घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण,जागतिक दर्जाची विद्वत्ता बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची
प्रवृत्ती संघटन कौशल्य शिस्तबद्धता व नेटकेपणा
,वक्तृत्व,इंग्रजी भाषेवरील प्रभाव,प्रचंड वाचन, संशोधनात्मक अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन अशा प्रकारच्या
असंख्य गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांना महामानव म्हटले जाते अशा महामानवास शत शत नमन !!!!

   
                                           
धन्यवाद..

जय
हिंद – जय भारत

                                                                                                            निर्मिती व संकलन –  

आशिष अनिल  देशपांडे (सर)  

राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक

 कॉल व व्हॉट्अॅप  9021481795

वरील भाषणाची pdf डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर स्पर्श करा..

 

Ambedkar Jayanti Speech in MarathiAmbedkar Jayanti Speech in Marathi

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *