FREE BUS TRAVELLING FOR SSLC EXAM STUDENTS MARCH/APRIL 2023
सन 2022 – 2023 सालातील SSLC परीक्षार्थींना परीक्षा कालावधीत मोफत बस प्रवास सुविधा मिळणेबाबत…
DATE – 21.03.2023
31-03-2023 ते 15-04-2023 या कालावधीत कर्नाटक SSLC वार्षिक परीक्षा 2022-23 घेण्यात येणार आहे आणि परीक्षेच्या कालावधीत SSLC विद्यार्थ्यांना महामंडळाच्या बसमधून प्रवेशपत्रांच्या पुराव्यावर परीक्षा केंद्रांपर्यंत मोफत प्रवास करण्याची मुभा मिळावी अशी विनंती अध्यक्ष,कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळ यांच्यावतीने करण्यात आली होती.
राज्यातील SSLC विद्यार्थ्यांच्या हितासाठी, सन 2022-23 मधील दिनांक:31-03-2023 ते 15-04-2023 परीक्षेच्या तारखांना म्हणजेच परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना “SSLC परीक्षेचे प्रवेशपत्र” दाखवून निवासस्थान ते परीक्षा केंद्र आणि परत आपले शहर, उपनगर,गावाकडे सामान्य आणि एक्स्प्रेस बसमधून मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ABC
त्यानुसार, महामंडळाच्या सर्व ड्रायव्हर्स/ ऑपरेटर्सना SSLCच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत नियोजित परीक्षा केंद्रांवर परीक्षा प्रवेशपत्राचा पुरावा दाखवून मोफत प्रवास करण्याची आणि निवासस्थानी परत पोहोचविण्यासंबंधी योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच,प्रवेशपत्राच्या आधारे बसच्या नियोजित मार्गावरील परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी बसमध्ये चढलेले विद्यार्थी असल्यास आणि जर नियोजित मार्गावर परीक्षा केंद्र नसेल तर अशा त्यांच्या परीक्षा केंद्रावर जाण्याची विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात यावी अशी सूचना बसचे ड्रायव्हर्स/ ऑपरेटर्सना देण्यात आली आहे.