कलिका चेतरिके
इयत्ता पाचवी
विषय -मराठी
अध्ययन कृती 10:5 महात्मा गांधीजींनी केलेले कार्य
भारताच्या स्वतंत्रता युद्धातला महान सेनानी, उदारता आणि सत्याचा महामेरू म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नाव घेतो. त्यांनी सत्य अहिंसा ब्रह्मचर्य असे जीवन तत्व स्विकारली होती. गांधीजी जेंव्हा दक्षिण आफ्रिकेत होते तेंव्हा त्यांच्याकडे अत्यंज येत. त्यांच्या बरोबर बोलणे खाणेपिणे होत असे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर १८६९ या दिवशी झाला. त्यांनी चले जाव चळवळ, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन करून ब्रिटिशांना भारतातून हाकलून देऊन 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.. म्हणून सर्व जगाने त्यांना महात्मा म्हणून ही पदवी दिली.
फिल्ड मार्शल करिअप्पा
कोडगुतील आदर्श व्यक्ती कोडगुचा परिचय जगाला करून देणारे, जनरल कोंडदेर मादप्पा करीअप्पा हे मुख्य होत. ब्रिटिशांच्या काळात ते प्रथम भारतीय जनरल झाले. स्वतंत्र भारताचे भूसेना, नौसेना, वायुसेना चे प्रथम अधिपती झाले. त्यांचा कार्यभार, साहस, शौर्यासाठी त्यांना फिल्डमार्शल ही पदवी बहाल करण्यात आली.
जनरल थीमय्या-
सुभाष चंद्र बोस
सुभाषबाबूंनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला होता. एकदा त्यांना प्रसिद्ध बंगाली साहित्यीक विजय रत्न मुजुमदार यांनी विचारले, शिवाजी महाराजा वरील एखाद्या उत्तम पुस्तकाचे नाव सांगू शकाल का त्यांनी गिरीश चंद्र घोष यांच्या ‘छत्रपती शिवाजी’ या नाटकाचे नाव सांगितले. हे सर्व विचार पाहिल्यावर इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन भारतातून निसटून जाऊन आझाद हिंद सेनेची स्थापना करून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या प्रयत्नात सुभाषबाबूंनी छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता..
कृतनिश्चयी भगतसिंग
भगतसिंग लाहोर सेंट्रल जेल मध्ये होते. त्यावेळी तुरुंगातला चीफ वॉर्डन सरदार चतुरसिंग होता. 23 मार्च च्या दिवशी दुपारी तीन वाजता त्याला सूचना मिळाली आज संध्याकाळी तिघानाही फाशी दिली जाईल.
सकाळ-संध्याकाळ तो गुरुवाणीचा पाठ करीत असे. मांझी आपल्याला कळकळीची एकच विनंती आहे कि आता या शेवटच्या वेळी तरी गुरूंचे नामस्मरण करावं गुरुवाणी चा पाठ करावा. ते ऐकताच भगतसिंग जोरात हसले व म्हणाले “आपण जर मी शेवटच्या वेळी नामस्मरण केले तर मी भीत्रा आहे असे वाटणार.” देशासाठी त्यांनी आपले प्राण दिले.
1) कोडगुतील आदर्श व्यक्ती कोण होते?
उत्तर -फिल्ड मार्शल करिअप्पा
उत्तर – महात्मा गांधीजींनी सत्य अहिंसा ब्रह्मचर्य ही जीवन तत्वे स्वीकारली होती.
उत्तर – जनरल थिमय्या यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात महत्त्वाची कामगिरी केली.
उत्तर -फील्ड मार्शल हे पद करिअप्पा यांना मिळाले.
उत्तर – सुभाष चंद्र बोस यांनी छत्रपतींचा आदर्श घेतला.
उत्तर – भगतसिंग लाहोर सेंट्रल जेलमध्ये होते.
कडूलिंबाचे तेल तसेच पेंड या दोन्हीमध्ये कीटकनाशक गुण विशेषत्वाने आढळून आले आहेत. आपल्याकडे 1960 मध्ये भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने कडुलिंबाचा पद्धतशीर अभ्यास सुरू केला. कडुलिंबाच्या बियांचा अर्क व तेल किडींना दूर सारतो. किडीवर त्याचा परिणाम होतो. किडींच्या निर्मोचनावर परिणाम होतो. भरणप्रतिबंधक, परिणाम जननक्षमता कमी होते. तसेच ज्या ठिकाणी तेल किंवा फवारले जात त्या ठिकाणी कीटक अंडी घालण्यास जात नाही. बुरशी, जंतू, विषाणू, सूत्रकृमी इत्यादी प्रतिबंध करण्याची क्षमता कडूलिंबामध्ये दिसून येते. निराळ्या 200 प्रकारच्या किडीवर त्याचा अनुकूल परिणाम दिसून आला.
1) कोणत्या साली भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने कडुलिंबाचा अभ्यास केला ?
उत्तर – 1960 साली भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने कडुलिंबाचा अभ्यास केला.
2) कडुलिंबाच्या तेलाचा वापर कशासाठी करतात?
उत्तर – कडुलिंबाच्या तेलाचा वापर किडींना मारण्यासाठी करतात.
भारतीय संस्कृतीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळाच्या बाहेरचे आवरण म्हणजे काथ्या. काथ्या पासून दोर, चटया, नाजूक वस्तूना धक्का लागू नये म्हणून बाजूच्या आवरणात काथ्या वापरतात. रबर युक्त काथ्या, खुर्च्याच्या बैठका, वाहनातील बैठका, गाद्या, काथ्यांचा दोऱ्या टिकाऊ व खाऱ्या पाण्यात कुजत नसल्याने जहाजावर त्याचा योग्य उपयोग करतात.
तेल
• नारळाचा खाद्यभाग असलेले खोबरे मोठ्या प्रमाणात साबण उद्योग धंद्यातही वापरले जाते. त्यातून 65 ते 70 टक्के तेल मिळते. खाऱ्या व कठीण पाण्यातही त्याला चांगला फेस येतो. केसांना ला वण्यासाठी पुरातन कालापासून खोबरेल वापरले जात आहे. आता ते शाम्पू, शेव लोशन, सौंदर्यप्रसाधनात वापरतात.त्वचेत त्वरित शोषले जात असल्यामुळे हे तेल मलमामध्ये आधार द्रव्य म्हणून वापरतात. खोबरेल तेल व त्यातील मेदाम्लावर आधारित पदार्थ अन्न, वस्त्र, चर्म, कागद आणि कृत्रिम इत्यादी उद्योगात वापरतात. डीटर्जंट मध्येही तेलाचा वापर केला जातो.
3) काथ्यापासून काय काय बनवतात?
उत्तर – काथ्यापासून चटई,पायपुसणी, दोऱ्या इत्यादी बनवतात.
उत्तर – खोबरेल तेलाचा उपयोग साबण,डालडा,मेणबत्ती, सौंदर्य प्रसाधने इत्यादी तयार करण्यासाठी करतात.
तळ पायाची माती मनाला लागू नये, म्हणून शामची काळजी घेणाऱ्या श्यामच्या आईने नेहमी सद् विचार यांच्या पवित्र गंगाजलाने श्यामचे मन हे पवित्र निर्मळच राखलं. बहिण आणि भावाच्या अतूट नात्याची आईने श्यामला सांगितलेली चिंधीची गोष्ट ही शामच काय पण आपणही विसरणार नाही.
ओवाळीते भाऊराया रे,
वेड्या बहिणीची वेडी रे माया ||
भर्जरी हा पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधु शोभे नारायण एकदा काय झालं श्रीकृष्ण आणि त्यांची सख्खी बहीण सुभद्रा ही आपल्या महालात काही गप्पा गोष्टी करत असताना अचानक पणे कशानेतरी श्रीकृष्णाला बोटाला कापलं. सुभद्रेने चिंधी हवी म्हणून खूप धावपळ केली. पण नेमक त्याच वेळी द्रोपदी तेथे आली तिने कृष्णाचं कापलेला ते बोट बघितलं. भरजरी शालू फाडला बोटाला चिंधी बांधली. एकच उद्दिष्ट असतं ते म्हणजे दुःख वेदना दूर करायचं तिथे कोणत्याही व्यवहारिक हिशोबाला जागा नसते.
निसर्गाला जपू
निसर्ग आपल्यावर प्रेम करतो कोणालाच कसं त्याच्यावर प्रेम करावंस वाटत नाही कुणास ठाऊक! खळखळ नदी वाहते आहे. दूरवर डोंगर आहेत. हिरवीगार झाडे आहेत. निळशार आकाश आहे. उडणारी पाखरं आहेत. हिरवीगार झाडं आहेत फुलणारी फुले आहेत. किती सुंदर बाग आहे.
वाऱ्यासंगे नाचती रंगबेरंगी फुले
नदीच्या पाण्यात निळे आकाश खेळे
सळसळ झाडे गाती गाणी आपली
आकाशाकडे पाखरांची सर निघाली.