EPIC CARD & AADHAR NUMBER LINKING

        


 

मतदार ओळखपत्रासोबत आधार नंबर लिंक कसे करावे? 




 

    18 वर्षांवरील सर्व भारतीयांना एक व्यक्ती,एक मत या आधारावर निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.तथापि काही ठिकाणी या विशेषाधिकाराचा गैरवापर होताना निदर्शनास येत आहे.कारण अशा अनेक व्यक्ती आहेत  ज्यांच्याकडे एकाच नावाने अनेक मतदार ओळखपत्रे आहेत.एखादी निवडणूक प्रक्रिया निरपेक्षपणे पार पाडण्यासाठी हे धोक्याचे आहे.म्हणून हा धोका दूर करण्यासाठी सरकारने एखाद्या व्यक्तीचे मतदार ओळखपत्र (ज्याला EPIC म्हणून ओळखले जाते) आधार कार्डशी जोडण्याचे पाऊल उचलले आहे.

    आधार नंबर हा प्रत्येक भारतीयाला दिलेला एक अद्वितीय 12 अंकी नंबर आहे.मिळालेला एकाच आधार क्रमांक व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यभर वैध असतो.कारण आधार कार्डसाठी संबंधित व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती आवश्यक असते जसे की,त्यांचे फिंगरप्रिंट आणि बुबुळ स्कॅन त्यामुळे एका व्यक्तीकडे फक्त एकच आधार क्रमांक असू शकतो.

    अशा प्रकारे, EPIC शी आधार लिंक केल्याने एकाच व्यक्तीच्या नावावरील बोगस किंवा अनेक मतदार ओळखपत्रे असतील तर तो धोका दूर होईल.

चला मग सोप्या पद्धतीने जाणून घेऊया EPIC कार्ड (मतदार कार्ड) आधार नंबर बरोबर लिंक करायची प्रक्रिया…

यासाठी आवश्यक गोष्टी – 

मतदान कार्ड 

आधार कार्ड 

मोबाईल 

EPIC कार्ड (मतदार कार्ड) आधार नंबर बरोबर मोबाईल वर लिंक करू शकता किंवा आपल्या वार्डच्या BLO ना संबंधित कागदपत्रे देऊन लिंक करू शकता…




आपण स्वतः मोबाईलवर लिंक करण्यासाठी खालील चित्रमय माहितीचा उपयोग करा..

1) प्रथम मतदान कार्ड,आधार कार्ड ,मोबाईल सोबत ठेवा.

2) गुगल प्ले स्टोर जाऊन VOTER HELPLINE App डाउनलोड करा.

STEP – 1




STEP – 2

IMG 20220802 154148

STEP – 3

IMG 20220802 154255

STEP – 4

IMG 20220802 154317





STEP – 5

IMG 20220802 154353

STEP – 6

IMG 20220802 154804

STEP – 7

IMG 20220802 155208




STEP – 8

IMG 20220802 155503

STEP – 9

IMG 20220802 155640

STEP – 10

IMG 20220802 155808




CLICK HERE TO INSTRUCTIONS IN PDF

Click below button for video information



Share with your best friend :)