दहावी निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी महत्वाची माहिती …
सन २०२१-२२ सालातील दहावी बोर्ड परीक्षा २८ मार्च ते ११ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आली होती.सुमारे 8.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.ते सर्व विद्यार्थी आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.कांही दिवसापूर्वी १५ मे पर्यंत दहावी निकाल जाहीर केला जाईल अशी बातमी होती.पण कांही अडचणीमुळे त्यादिवशी निकाल जाहीर करणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले होते.
आज सकाळी शिक्षण मंत्री बी.सी.नागेश यांनी TWITTER च्या माध्यमातून दहावीचा निकाल दि. 19 मे २०२२ रोजी जाहीर केला जाईल असे सांगितले आहे.तरी 19 मे २०२२ रोजी विद्यार्थी karresults.nic.in या वेबसाईट वरून आपला निकाल पाहू शकतील.