मराठीतील अनेक लेखक,कवी,नाटककार,शाहीर यांनी आपले लेखन करताना आपले पहिले नाव,आडनाव किंवा आपल्या सग्यासंबंधीची नावे वापरली आहेत.त्यालाच मराठीत टोपणनाव व इंग्रजीत Nickname असे म्हटले जाते.कांही मराठी साहित्यिकांच्या टोपणनावांची यादी खालीलप्रमाणे –
नाव टोपणनाव
ज्ञानेश्वर
विठ्ठलपंत कुलकर्णी – संत
ज्ञानेश्वर
तुकाराम
बोल्होबा आंबिले –संत तुकाराम
नारायण सूर्याजी ठोसर – संत रामदास
मोरोपंत रामचंद्र पराडकर – मोरोपंत
महदंबा ऊर्फ महादाईसा – मराठी भाषेतील आद्य कवयित्री
विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे – पु.ल.,भाई
राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज
प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार
गोविंद विनायक करंदीकर – विंदा करंदीकर
कृष्णाजी केशव दामले – केशवसूत/ आधुनिक मराठी
काव्याचे कवितेचे जनक
त्र्यंबक बापूजी ठोमरे – बालकवी
आत्माराम रावजी देशपांडे – अनिल
यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार
भास्कर रामचंद्र तांबे – राजकवी
ना.धो.महानोर – रानकवी
बहिणाबाई नथूजी चौधरी – बहिणाबाई
पांडुरंग सदाशिव साने – साने गुरुजी
होनाजी सयाजी शेलारखाने – होनाजी
माधव त्रंबक पटवर्धन – माधव जुलियन
शंकर काशिनाथ गर्गे – दिवाकर
विष्णुशास्त्री चिपळूणकर – मराठी भाषेचे शिवाजी
काशिनाथ हरी मोडक – माधवानुज
नारायण मुरलीधर गुप्ते – बी
दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी
शाहीर राम जोशी – शाहिरांचा शाहीर
मधु मंगेश कर्णिक – मधु भाई
यशवंत दिनकर पेंढारकर – महाराष्ट्र कवी
बा.सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रवर्तक /मराठी कवितेचे जनक
माणिक शंकर गोडघाटे – ग्रेस
वीरसेन आनंद कदम – बाबा कदम
अनंत भवानीबावा घोलप – अनंत फंदी
दिनकर गंगाधर केळकर – अज्ञातवासी
शंकर केशव कानेटकर – गिरीश
गणेश
हरी पाटील – ग.ह.पाटील