मराठी विषयातील महत्वाचे दोन तीन मार्कचे प्रश्न व त्याची उत्तरे –
पद्य विभाग
दहावी वर्गातील मराठी विषयाचा अभ्यास करताना व परीक्षेसाठी तयारी करताना महत्वाचे दोन गुणांचे , तेन गुणांचे,चार गुणांचे प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली पाहिजेत.कांही तज्ञ शिक्षक वृन्दानी निर्माण केलेले हे महत्वाचे प्रश्न आपणासा पाठवत आहोत.
कविता ३ भला जन्म हा
१) “हरिरस सांडून घेशी दुधा” (संदर्भासहित स्पष्टीकरण करा )
संदर्भ:- वरील कवितेची ओळ शाहीर राम जोशी यांच्या ‘भला जन्म हा‘ या अध्यात्मिक
लावणीतील असून खोट्या भक्तीचे वर्णन करताना कवीने ही ओळ म्हटली आहे.
स्पष्टीकरण:- अनेक लोक धर्माचे कार्य करताना भक्तीचे अवडंबर
माजवतात.विविध प्रकारचे विधी करतात मात्र प्रत्यक्षात परमेश्वराशी मतभेद असतात.
त्यामुळे खरी भक्ती कर नाहीतर दुधासारखे पदार्थ सांडून घेशील असे कवी स्पष्ट करतो.
२) “ही बार बार तलवार येईल का पुन्हा ?” (संदर्भासहित स्पष्टीकरण करा.)
संदर्भ:- वरील कवितेची ओळ शाहीर राम जोशी यांच्या भला जन्म
हा या अध्यात्मीक लावणीतील असून परमेश्वर भक्तीचे महत्त्व पटवून देताना कवीने ही
ओळ म्हटली आहे.
स्पष्टीकरण:- आपल्याला जो नरजन्म मिळालेला आहे त्यामुळे आपण
भाग्यवान आहोत. हा तलवार रूपी जीव सांभाळून ठेवला पाहिजे मनातील द्वेष मत्सर काढून
टाकला पाहिजे हे मांगताना वरील ओळ कवी स्पष्ट करतो.
पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा
१) जरातरी समज धर अंतरी असे कवी का म्हणत आहे.
उत्तर :- कवी रामजोशी आपल्या लावणीतून भक्तीच्या ढोंगी पणावर आसूड ओढले आहेत. ते म्हणतात की, हे शहण्या माणसा तुला लाभलेल्या जन्माचे महत्त्व समजून ज्याप्रमाणे तू वाग माणव जन्मात नेहमीच होणाऱ्याचूकापासून सावध राहून परमेश्वराशी एकनिष्ठ रहा कारण मानवजात भवसागरातून तारून नेणारा तो परमेश्वरच आहे. त्यामूळे कोणत्याही प्रकारचे ढोंग परमेश्वरच्या दरबारी करू नको याची समज तुझ्या मनाला घाल असे कवी म्हणतो.
२) “भगवंत भुकेला भक्तीचा पाहूणा” या ओळीचा अर्थ सांगा.
उत्तर :- अनेक लोक धर्माचे कार्य करताना विविध गोष्टीचे अवडंबर माजवतात. जनात एक च मनात एक असे आचरण असते. प्रत्यक्षात परमेश्वराशी कधीही जवळीक नसते. पणकवी रामजोशी मते भगवंत हा भक्तीला भुकेला असतो. तो भक्ताकडून कधीच कोणत्याही प्रकारची अपेक्षा करीत नाही. शुद्ध आचरण सत्य, वचन या गोष्टी परमेश्वरला अपेक्षित असतात भक्तीचा डांडोरा पिटल्याने आपण परमेश्वराजवळ जाऊन पोहचू शकत नाही तर परमेश्वरची निर्व्याज सेवा आपण केली तर ती खरी भक्ती होय.
कविता ४ पाहुणे
पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा.
१) शेवटचा आई का गहिवरते ?
आईला बाळ्या जेव्हा विचारतो की, हे पाहूणे केव्हा जाणार यांना घरदार नाही का ? उत्तर: त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर देताना आईला मागचे पाहूणे आठवतात. व तिला गहिवरून येते कारण मागे आलेले पाहूणे अनेक दिवस ठाण मांडून बसलेले असतात. त्याप्रमाणे हे ही पाणे ठाण मांडून बसले तर पंचाईत होईल असे तिला वाटते.
आठ ते दहा वाक्यात उत्तरे लिहा
१) पाहूणे कसे निगरगट्ट आहेत ते सांगा.
उत्तर:-पाहूणे कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता कवीच्या घरी पहाटे पहाटेच हजर होतात व घराच्या ओसरीवर पसरलेले असतात स्वत: च्या
घरात असल्यासारखेच वागतात. सर्वाच्या समोरच स्वंयपाक घरातील खाद्यपदार्थाच्या डव्यावर हल्ला करतात. वडिलांच्या पान सुपारीच्या पेटीतून पानाचे व विडीचे जुडगे पळवितात. स्वत: च्या वर्तनाचे त्यांना काहीच वाटत नाही. अशाप्रकारे पाहूणे निगरगट्ट आहेत.
कविता ५ या भारतात बंधुभाव
पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा
१) मानवता व राष्ट्रभावना लोकांना कळल्यास काय होईल ?
उत्तर :- मानवता व राष्ट्रभावना जर लोकांना कळली तर देशात होणारी जातीय दंगली नष्ट होतील. मानवता सर्वश्रेष्ठ धर्म आहे मानवता धर्म कळला तर राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागेल कोणीही राष्ट्रद्रोही काम करणार नाही.
२) देशातील सकलांना मानवता कळू दे असे कवी का म्हणतात ?
उत्तर :-देशात अस्पृश्यता उच्चनीचता आहे. ती नष्ट व्हायची झाल्यास अखिल मानवजात एक झाली पाहिजे. अन्याय अत्याचार होऊ नये असे वाटत असेल तर मानवता धर्म कळला पाहिजे.
कविता ६ सत्कार
पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा
१) मातीची मृत्यूवर मात म्हणजे काय ?
उत्तर :- लाव्हारसामुळे ज्वालारूपी पृथ्वी शांत होत असताना या पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होईल याची शाश्वती नसताना म्हणजेच लाव्हारसाने माती
मृत झाली असावी असे वाटत असतेवेळी पृथ्वीच्या पोटातून एका लहानशा बीजाचा अंकूर वाहेर पडतो यालाच कवीने मातीची मृत्यूवर मात असे म्हटले आहे आणि याच तृणपात्याचा सत्कार सोहळा मांडला आहे.
आठ ते दहा वाक्यात उत्तरे लिहा
१) हिरव्या तृणपात्याचा सत्कार का व कसा केला आहे ?
उत्तर :- लाव्हारसामुळे माती मृत होते. या पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होईल याची शाश्वती नसताना पृथ्वीच्या पोटातून एका लहानशा वीजाचा
अंकूर वाहेर पडतो. हे हिरवे तृणपाते पृथ्वीवर जन्म घेते म्हणून कवी या तृणपात्याचा सत्कार सोहळा मांडतो..
या सत्कार सोहळ्याचे स्वागतगीत पक्षी म्हणतात.ढग त्याला मुजरा करतात. लाल मातीरूपी गुलाल उधळला जातो. सत्कार आनंददायी व्हावा म्हणून दक्षिण-उत्तर पावसाच्या सरीवर सरी कोसळण्यास सुरुवात होतात, सर्वत्र मातीचा सुगंध दरवळतो तसेच आठ दिशामधून विजयाचा जयजयकार घुमू लागतो. अशाप्रकारे तृणपात्याचा सत्कार केला आहे.
कविता क्र. 7 नेनंता
गुराखी
दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.
४) गुराख्याच्या जीवाची आग का होते?
उत्तर :- गुराखी आपली ढीगभर गुरे चारण्यासाठी नेतो.त्यावेळी ती जनावरे विखुरतात व त्यांना एकत्र करण्यासाठी या लहान जीवाला खूप राग येतो.या
रागामुळेच त्याच्या जीवाची आग होते.
पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा.
५) गुराखी कृष्ण झाला नाही असे कवी का म्हणतो?
उत्तर :- गोकूळातील श्रीकृष्णाच्या गाई मुबलक दुभत्या होत्या.त्यामुळे कृष्णाला पोटभर दूध मिळत असे, मात्र या गरीब गुराख्याच्या गाई आटल्या आहेत.तसेच त्याची आई दुसऱ्याकडून उसणे दूध मागून आणते म्हणून गुराखी श्रीकृष्ण झाला नाही असे कवी म्हणतो.
कविता 8 धरण
दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा
१) धरण बांधताना तिने कोणते कष्ट सोसले ?
उत्तर :- धरण बांधण्याच्या कामासाठी ती सकाळी लवकर उठून घरातील कामे आवरते आपल्या तान्ह्या बाळाला वेताच्या बुट्टीखाली झोपवून भर उन्हात
दगड फोडते जणू तिने वेदनांनी आपल्या मरणच यातनाच सोसल्या आहेत असे कष्ट करते.
२) पीठ जात्यात आटलं” याचा अर्थ स्पष्ट करा ?
उत्तर:- या कवितेतील सामान्य श्री धान्य दळण्याची तयारी करते, पण तिच्याकडे पुरेसे धान्य नसल्या कारणाने हवे तितके पीठ मिळत नाही. म्हणून पीठ जात्यात आटलं असे म्हटले आहे.
३) कामावर जाण्यापूर्वी ती कोणती कामे करते ?
उत्तर :-धरण बांधण्याच्या कामाला जाण्यासाठी ती सकाळी लवकर धान्य दळते,कणी कोंड्याचा स्वयंपाक करून, आपल्या तान्हया बाळाला वेताच्या बुट्टीखाली झोपवून कामावर जात असे.
पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा.
1)कष्ट करून शिवार पिकविणाया खीला पोटभर पाणी का मिळत नाही ?
उत्तर:- या कवितेतील सामान्य स्खीयांना धरणाची कामे करण्यासाठी राबवून घेतले जाते. या कष्टकरी स्त्रीयांच्या जीवावर धरणे बांधून इतरांचा शिवार पिकवला जातो. पण इतके कष्ट सोसून देखील त्या धरणातील पाणी त्या स्त्रीयांना मिळत नाही. कारण या स्त्रीयांचा त्या पाण्यावर अधिकार नाही म्हणून घोटभर पाण्यासाठी फिरावं लागते.
कविता क्र.
१२ पाठ आणि पोट यांचा झाला टाळ
पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा
१) भूके जीव काय काय करतील असे कवी म्हणतो?
उत्तर :-भूके जीव देवाला इशारा देतात, तू समोर येऊ नको नाहीतर तुझे रक्त देखील वर्ज्य नाही.तसेच आमची भूक शमविला नाहीस तर तुझ्या माथ्यावर घणाचे घाव घालतील. असे कवी म्हणतो.
२) याकवितेत विठ्ठलाला कोणती विनवणी केली आहे?
उत्तर :- या कवितेतील भूके जीव आहेत. हे जीव सतत उपाशी असतात, व ही उपाशी माणसं तुझे नामस्मरण करू शकत नाहीत. त्यामुळे विठ्ठला या सर्वांची भूक शमव अशी विनवणी केली आहे.