कर्नाटक सरकारची शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नवीन स्कॉलरशिप योजना सुरु
या योजनेसाठी पात्र विद्यार्थी खालील लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात…
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या दहावी नंतरच्या पुढील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय 28/07/2021 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
कर्नाटक सरकार आदेश : AGRI-AML/141/2021, ಬೆಂಗಳೂರು ದಿನಾಂಕ: 07.08.2021 नुसार वरील निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना पुढील शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी नवीन शिष्यवृत्ती योजनेची रूपरेषा सांगितली आहे.
SSLC किंवा दहावी इयत्ता पूर्ण करून कर्नाटकातील अधिकृत शिक्षण संस्था किंवा विश्वविद्यालयात पुढील उच्च शिक्षणास प्रवेश घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना DIRECT BENEFIT TRANSFER (DBT) पद्धतीने 2021-22 या आर्थिक वर्षापासून खालील नमूद केलेल्या यादीनुसार शिष्वृत्ती रक्कम वार्षिक शिष्यवृत्तीच्या रूपाने देण्यात यावी.असे सरकारने अनुमोदन दिलेले आहे.
SI.NO. | कोर्सचे नाव | मुलगा | मुलगी |
1 | PUC/ITI/DIPLOMA | 2500/- | 3000/- |
2 | B.A./B.Sc./B.Com इत्यादी (MBBS/BE/B TECH आणि इतर व्यावसायिक कोर्स | 5000/- | 5500/- |
3 | LLB/PARA MEDICAL B.PHARM,NURSING इत्यादी व्यावसायिक | 7500/- | 8000/- |
4 | MBBS/BE/B TECH व सर्व पदविका कोर्स | 10000/- | 11000/- |
य शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी नियमावली –
1) राज्यातील शेतकरी म्हणजे राज्यातील कोणत्याही भागात स्वत:च्या नावावर शेतजमीन असणारी व्यक्ती किंवा शेतीकाम करणारी व्यक्ती.
2) शेतकऱ्यांची मुलं म्हणजे कायद्यानुसार दत्तक घेतलेली मुलं किंवा स्वतःची जैविक संतती.जर एखाद्या मुलाचे पालक नाहीत पण त्याच्या नावे शेत जमीन आहे.अशा मुलांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल..
अटी व नियम समजून घेण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा
या योजनेसाठी पात्र विद्यार्थी खालील लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात…