पांगेरी बी येथे जिल्हा आदर्श शिक्षक व
देणगीदारांचा सत्कार समारंभ….
सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा
पांगिरे बी येथील शिक्षक श्री ए.आर.कदम यांना 5
सप्टेंबर 2021 रोजी
कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघ बेंगळुरू विभाग चिक्कोडी यांचेकडून सन 2021 सालचा जिल्हा
आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्याबद्दल श्री कदम सर यांचा पांगिरे बी
शाळेच्या SDMC समिती,शिक्षक वृंद व
गावाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच
गावातील नागरीक श्री.प्रमोद वंजोळे यांचेकडून शाळेला 10,000/- रुपयांची
देणगी व प्रकाश कुंभार आणि संजीवनी कुंभार
(SDMC सदस्या) यांनी
5000/- रुपयांची
देणगी दिली त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे
SDMC सदस्य व शिरगुप्पी ग्राम पंचायत सदस्य श्री बाळासाहेब देवडकर,शिरगुप्पी ग्राम पंचायत सदस्य व माजी SDMC अध्यक्ष श्री शिवाजी कुंभार,शाळेचे
मुख्याध्यापक श्री. जी.बी.कुंभार,शिक्षक
श्री.बी.एस. पाटील,शिक्षिका
सौ.आर.पी.पोवार यांनी मनोगत व्यक्त करून कदम सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
दिल्या..व शाळेच्या देणगीदारांचे आभार मानले.
या कार्यक्रमास SDMC
अध्यक्ष भरत पोटले,SDMC
उपाध्यक्षा व शिरगुप्पी ग्रा.पं.
सदस्या सौ.कविता सर्जेराव कांबळे तसेच SDMC
सदस्य शिवाजी चव्हाण,गोविंद कुंभार व शाळेचे शिक्षक एस.के.
चिखले,बी.पी.कांबळे, एन. आर. गारडे आणि पालक विश्वास माने व इतर उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री. ए. जी. औंधकर व आभार प्रदर्शन सचिन कमते
यांनी केले.