पाचवी मराठी पाठ 5. वीर हुतात्मा नारायण
स्वाध्याय
अ.नवीन शब्दांचे अर्थ.
सुसंस्कृत – चांगले संस्कार
स्वराज्य – स्वत:चे राज्य
हुतात्मा – देशासाठी
मरण पत्करणारा
दीन – गरीब
अग्रभागी – सर्वात पुढे
तेजस्वी – बाणेदार
या नोटसच्या pdf साठी येथे क्लिक करा.. CLICK HERE
आ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.
1.आपल्या
देशाला कशाची परंपरा आहे?
उत्तर – आपल्या देशाला शूरवीरांची
परंपरा आहे.
2.देशातील
जनता का कंटाळली होती?
उत्तर – देशातील जनता इंग्रजांच्या
दडपशाहीला कंटाळली होती.
3. चलेजाव
चळवळ कोणी सुरु केली?
उत्तर – चलेजाव
चळवळ महात्मा गांधीजींनी सुरु केली.
4.नारायण
कोठे शिकत होता?
उत्तर – नारायण हुबळीतील लॅमिंग्टन हायस्कूलमध्ये शिकत होता.
5. आईने
नारायणाला कोणता आशीर्वाद दिला?
उत्तर – आईने नारायणाला “देव तुला सामर्थ्य देवो,काळजी घे” असा आशीर्वाद दिला.
इ.रिकाम्या जागी
कंसातील योग्य शब्द निवडून लिही.
(सैरावैरा,1942, दुर्गदबैल, तिरंगाध्वज, महान, व्यापाराच्या, अग्रभागी)
1. भारत
हा एक महान देश आहे.
2.
ब्रिटीश भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले.
3.
चलेजाव चळवळ 1942 साली झाली.
4.
मोर्चा हुबळीतील दुर्गदबैल ठिकाणी होता.
5.
नारायणला मोर्चाच्या अग्रभागी उभे केले होते.
6.
बांबूच्या काठीला तिरंगाध्वज बांधला होता.
7.
मोठी माणसे सैरावैरा पळू लागली.
खालील प्रश्नांची दोन
तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. पूर्वी
देशावर इंग्रजांनी कसे वर्चस्व मिळविले?
उत्तर – इंग्रज व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले होते.तेंव्हा
भारतातील लोक अशिक्षित होते तर राजे लोकात एकी नव्हती.याचा फायदा घेत इंग्रजांनी
भारतावर वर्चस्व मिळविले.
2.माणसांच्या
हातात काय काय होते?
उत्तर – माणसांच्या हातात तिरंगा झेंडा आणि इंग्रजानो चालते
व्हा असे सांगणारे फलक होते.
3. नारायणचा
पोशाख कसा होता?
उत्तर – अंगावर खादीचे कपडे,डोकीवर गांधी टोपी व हातात
तिरंगा ध्वज बांधलेली बांबूची काठी असा नारायणचा पोशाख होता.
4. आई
नारायणाला का जाऊ देत नव्हती?
उत्तर – कारण नारायण अजून लहान होता आणि मोर्चा मोठ्यांसाठी
होता असे समजून आई नारायणाला जाऊ
देत नव्हती.
5. त्याला
मोर्चाच्या अग्रभागी का उभे केले होते?
उत्तर – नारायणचे तेजस्वी डोळे व त्याच्या चेहऱ्यावर उत्साह
पाहून त्याला मोर्चाच्या अग्रभागी उभे
केले होते.
6. लोक
मोर्चात कोणकोणत्या घोषणा देत होते?
उत्तर – लोक मोर्चात ‘ब्रिटिशांनो चालते व्हा’, ‘भारत माता की जय’, ‘ वंदे
मातरम्’ अशा घोषणा देत होते.
7.नारायण
मोर्चामध्ये काय करत होता?
उत्तर – इंग्रजांचा गोळीबार सुरु होताच मोर्चातील लोक
सैरावैरा पळत होते पण नारायण एका ठिकाणी ठाम उभा राहून मोठ्याने घोषणा देत होता.
उ.खाली दिलेल्या
शब्दांचा नमुन्याप्रामाणे वाक्यात उपयोग करा.
नमुना : सुसंस्कृत आपला भारत देश सुसंस्कृत देश आहे.
1.
गौरव
– यशस्वी खेळाडूंचा गौरव केला.
2.
चळवळ – गांधीजीनी चलेजाव चळवळ सुरु केली.
3.
अन्याय – इंग्रज भारतीयांवर अन्याय करत असत.
4.
वैभव –
इंग्रजांनी भारतचे वैभव लुटून नेले.
5.स्वतंत्र – 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.
6.आशीर्वाद – मी दररोज
माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतो.
7.
घोषणा – मोर्चात लोक मोठ्याने घोषणा देत होते.
8.
स्वराज्य – भारतात स्वराज्य येण्यासाठी अनेकांनी प्राणाचे बलिदान
दिले.
9.
प्राण – स्वातंत्र्यासाठी अनेक भारतीयांनी आपले प्राण गमावले.
ऊ.खालील शब्दातील फरक
शिक्षकांच्या मदतीने समजून घेऊन लिही.
नमुना : दीन गरीब
दिन – दिवस
1. खून – ठार मारणे
खूण – चिन्ह
2.
सूत – धागा,दोरा
सुत – मुलगा,पुत्र
3.चिता – सरण
चित्ता – प्राण्याचे नाव
4. शिर – डोके
शीर – नस ,
रक्तवाहिनी
या नोटसच्या pdf साठी येथे क्लिक करा.. CLICK HERE