कर्नाटकातील इमारत बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीची रक्कम वाढवली… कमीत कमी 5000/- पासून 75,000 रुपयापर्यंत मिळणार शिष्यवृत्ती…
दि.13 ऑगस्ट 2021 रोजी प्रकाशित आदेशानुसार कर्नाटकातील इमारत बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम वाढवण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार आता इमारत बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगारांच्या मुलांना कमींत कमी 5000/- पासून 75,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.ही नवी योजना यावर्षी म्हणजे 2021- 22 या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार आहे.या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ज्या कामगारांची रीतसर नोंदणी झाली आहे अशा कामागारांच्यामुलाना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
शैक्षणिक कोर्स व इयत्तेनुसार खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती शैक्षणिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे…. अटी शेवटी दिलेल्या आहेत.
SI. NO. | शैक्षणिक कोर्स/इयत्ता | वार्षिक आर्थिक सहाय्य |
PRE MATRIC | ||
1 | KG/PRE PRIMARY/NURSERY(Age 3 to 5) | 5,000/- |
2 | 1st – 4th | 5,000/- |
3 | 5th – 8th | 8,000/- |
4 | 9th & 10th | 12,000/- |
POST | ||
5 | PUC 1ST & 2ND | 15,000/- |
6 | Polythechnic /ITI | 20,000/- |
7 | BSc / Nursing / GNM / ANM/Para | 40,000/- |
8 | D.Ed. | 25,000/- |
9 | B.Ed. | 35,000/- |
10 | Graduation (Any Discipline) | 25,000/- |
11 | LLB / LLM | 30,000/- |
12 | Any post graduation | 35,000/- |
Technical / Medical through NEET | ||
13
| B.E. / B.Tech. | 50,000/- |
M.E. / M.Tech. | 60,000/- | |
14
| Medical (MBBS.BAMS,BHMS,BDS And | 60,000/- |
MD | 75,000/- | |
15 | P.Hd./M.Phil (Any subject) | 25,000/- |
16 | IIT / IIM/ NIT/ IISER / AIIMS / NLU | Actual tution fee paid |
कांही महत्वाच्या अटी –
i. विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण होऊन चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेला असला पाहिजे.
ii पुढे, कर्नाटक सरकारच्या ई-गव्हर्नन्सने डिझाइन केलेल्या राज्य शिष्यवृत्ती पोर्टल (SSP) वर डीबीटी (DBT) पद्धतीने म्हणजेच थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती जमा करण्यात येणार आहे.
iv उपरोक्त अभ्यासक्रम कोणत्याही शाखेत / शाखांमध्ये किंवा वरील अभ्यासक्रमांच्या बरोबरीचा अभ्यास करणारे विद्यार्थी देखील त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमास लागू असलेल्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
V. नोंदणीकृत बांधकाम कामगार ज्यांचे सदस्यत्व शैक्षणिक आर्थिक सहाय्यासाठी अर्ज सादर करताना वैध आहे आणि ज्यांच्या मुलांनी वरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे ते शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
vi राष्ट्रीय शैक्षणिक मुक्त शिक्षण संस्थाच्या माध्यमातून विविध परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना विशिष्ट अभ्यासक्रमाच्या प्रत्यक्ष परीक्षा शुल्काची आर्थिक सहाय्य केले जाईल.
vii ही शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना 2021-2022 या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल.
अधिक माहिती साठी सरकारी आदेश पहा. आदेश डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..