देशाच्या गौरवासाठी राष्ट्रगीत गायन करा व भारत सरकारचे प्रमाणपत्र मिळवा…
आज संपूर्ण भारत देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा कारत आहे.सर्व भारतीय उत्साहात सहभागी होत आहेत.याचे औचित्य साधून भारत सरकारने सर्व भारतीयांना राष्ट्रगीत गायन करून त्याचा व्हिडिओ अपलोड केल्यास एक आकर्षक प्रमाणपत्र देण्याची योजना सुरु केली आहे..आज आपण सर्वजण या योजनेत सहभागी होऊया आणि देशाच्या अभिमानाचा गौरव करूया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै महिन्याच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात राष्ट्रगीताचा उल्लेख केला होता आणि rashtragaan.in या वेबसाईटच्या माध्यमातून देशवासियांसाठी एक राष्ट्रगीत गायनाचे व्यासपीठ देणार असल्याचे जाहीर केले होते. हे एक असे व्यासपीठ असेल जिथे कोणताही नागरिक येऊन ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत गाणे गाऊ शकतो.माननीय पंतप्रधानांची ही योजना यशस्वी होत असून या वेबसाईटला मोठ्या संख्येने लोक राष्ट्रगीत गायनात सहभागी होत आहेत व त्यांचे व्हिडिओ अपलोड करून झटपट प्रमाणपत्र मिळवत आहेत.
चला मग प्रथम जाणून घेऊया या योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया..
step 1 – rashtragaan.in या वेबसाईट वर जा.
step 2 Procced वर क्लिक करा.
step 3 आपली माहिती भरा व Let’s sing वर स्पर्श करा.
step 4 जे permission विचारतील ते सर्व allow करा..
step 5 Record वर स्पर्श करा व open झालेल्या कॅमेरासमोर उभा राहून राष्ट्रगीत गायन करा.
step 6 – राष्ट्रगीत संपल्यावर UPLOAD वर स्पर्श करा.
Step 7 आपल्या नावाचे आकर्षक व तिरंगा रंगाचे Certificate डाउनलोड करा.
आपले राष्ट्रगीत अपलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा..
CLICK HERE For Featured videos – click here
जय हिंद – जय भारत
आपण आपल्या देशाच्या गौरवासाठी 48 ते 52 सेकंदाचे राष्ट्रगीत नक्की गाऊ शकतो.
आपले गायन झाल्यावर इतर भारतीयांपर्यंत हा msg नक्की पोहोचवा..