आरोग्य सेतू app द्वारे कोविड -19 लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी –
-आरोग्य सेतू अॅप मुख्यपृष्ठावर, ‘COWIN’ टॅबवर स्पर्श करा.
‘COWIN’ चिन्हाखाली तुम्हाला
लस माहिती(Vaccination information)
लसीकरण (Login / Registration)
लसीकरण प्रमाणपत्र (Certificate)
लसीकरण डॅशबोर्ड असे चार पर्याय दिसू शकतात.
-त्यातील “लसीकरण” (Vaccination Login/Registration) टॅबवर टॅप करा आणि नंतर “Registration” पर्याय निवडा.
– आपला मोबाइल नंबर टाईप करा
-त्यानंतर मोबाईल नंबरवर OTP येईल.
– आलेला ओटीपी टाईप करा आणि “Validate” बटणावर क्लिक करा.
– एकदा नंबर पडताळणीनंतर तुम्हाला फोटो आयडी कार्ड निवडावे लागेल. (Aadhar,Pancer,Driving License,Passport,Pension Passbook इत्यादी पैकी ) तुमच्याकडे उपलब्ध आयडी प्रूफ निवडा.
– निवडलेल्या आयडी प्रूफ चा नंबर टाईप करा.
– आपले नाव, वय, लिंग भरा
-नोंदणी बटणावर क्लिक करा.
-आपण वय, लिंग, जन्माचे वर्ष यासारखे इतर तपशील देखील भरणे आवश्यक आहे.
(आरोग्य सेतु app द्वारे तुम्ही जास्तीत जास्त 4 लाभार्थ्यांची नोंदणी करू शकता.)
– येथे तुमची नोंदणी पूर्ण झाली.यानंतर तुमची माहिती खाली दिसेल.टी तपासून घ्या.
(एक नागरिक या मोबाइल नंबरने जास्तीत जास्त 4 नागरिकांचे Registration करू शकेल.)
यानंतर खाली येथे ‘शेड्यूल अपॉईंटमेंट’ दर्शविणारे बटण असेल. त्यावर क्लिक करा.
-येथे PINCODE किंवा जिल्ह्याच्या नावाने आपल्याला जवळचे लसीकरण ठिकाण निवडा.
– त्यानंतर तारीख आणि उपलब्धता निवडा.
– आणि ‘बुक’ बटणावर क्लिक करा.
– बुकिंग यशस्वी झाल्यावर तुम्हाला एक Message येईल. तो message लसीकरण केंद्रावर दाखवा.