22 फेब्रुवारी पासून 6 ते 8 वर्ग पूर्ण वेळ सुरु..- शिक्षणमंत्री सुरेशकुमार





    22 फेब्रुवारी पासून 6 ते 8 वर्ग पूर्ण वेळ सुरु..- शिक्षणमंत्री सुरेशकुमार

        बंगळुरू:  22 फेब्रुवारी पासून 6 ते 8 वर्गांसाठी पूर्ण वेळ शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे  अशी माहिती  शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बेंगळूर येथे विधान सौधमध्ये झालेल्या सभेत  शिक्षण राज्यमंत्री सुरेश कुमार यांनी माध्यमांना दिली.यावेळी ते म्हणाले, 9,10 आणि PUC च्या वर्गांची उपस्थिती चांगली आहे.विद्यार्थ्यांनी हजार राहणे हे बंधनकारक केलेलं नाही.तसेच विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

    पालकांनी सरकारला पहिली ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्याचे आवाहन केले होते.यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकार आणि टास्क फोर्सशी 5 वेळा बैठक घेऊन फायदे  व तोटे यावर चर्चा केलीकरण्यात आली आहे.तसेच अजीम प्रेमजी व्हीव्ही यांनी शाळेपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी देशाच्या विविध भागात सर्वेक्षण केले आहे.त्यांच्या सर्वेक्षणानुसार 90% विद्यार्थ्यांनी शाळेचा अभ्यास विसरला आहे.असा निष्कर्ष निघाला आहे.

    केरळ भागातून येणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी अद्याप कोरोनाचा अहवाल अनिवार्य आहे.अहवाल नकारात्मक असेल तरच त्यांना वर्गात येण्याची परवानगी आहे. 

मुलांना शाळेत येणे सक्तीचे नाही,परंतु शाळा खोलीवर आधारित पुढील निर्णय घेण्यात येतील.ते म्हणाले की, 1 ते 5 वर्गाना विद्यागम सुरु करण्यापूर्वी सर्व जिल्हा डीसींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला जाईल व योग्य दक्षता घेवून पहिली ते पाचवी वर्ग सुरू करण्यात येईल आणि येत्या काही दिवसांत योग्य निर्णय घेण्यात येतील.


Share with your best friend :)