भारतीय सैन्य दल पुन्हा एकदा तरुणांना देशाची सेवा करण्याची संधी देत आहे. सैन्याने अनेक वेगवेगळ्या जागांवर नोकर भरती केली आहे. या पदांसाठी आठवी उत्तीर्ण, दहावी उत्तीर्णांपासून ते बारावी उत्तीर्णांपर्यंत उमदेवार अर्ज करू शकतात.या सैनिक भरतीसाठी सैन्य दलामार्फत रॅली काढण्यात येणार आहे.कर्नाटकातील बेळगाव येथे मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या सर्वांसाठी नोंदणी प्रक्रियाही सुरू आहे..याची अधिक माहिती या पुढे दिली आहे. त्याशिवाय प्रत्येक राज्यात घेण्यात येणाऱ्या सैन्य भरती रॅलीची स्वतंत्र अधिसूचना पुढे दिल्या जात आहेत.
पदांची माहिती
सोल्जर जनरल ड्यूटी
सोल्जर टेक्निकल
सोल्जर नर्सिंग असिस्टेंट
सोल्जर क्लर्क / स्टोर कीपर टेक्निकल
शिपाई
सोल्जर ट्रेड्समन (दहावी पास)
सोल्जर ट्रेड्समन (आठवी पास)
लष्कराने अद्याप कोणत्या पदाच्या किती जागा रिक्त आहेत याची माहिती दिलेली नाही.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (पोस्ट्सनुसार)
सैनिक जनरल ड्युटी – दहावी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे)
सैनिक तांत्रिक – विज्ञान (पीसीएम) ते १२ वी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
सैनिक नर्सिंग सहाय्यक – विज्ञान (पीसीबी) ते १२ वी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
सैनिक लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल – कोणत्याही शाखेतील १२ वी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
शिपाई – १२ वी पास आणि फार्मामध्ये डिप्लोमा (वयोमर्यादा – १९ ते २५ वर्षे)
सैनिक ट्रेड्समन – दहावी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
सैनिक ट्रेड्समन – आठवी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
Eligibility Criteria
रॅली व अर्जाची माहिती
ARMY RECRUITMENT OFFICE – BELGAUM
नोंदणी / अर्जाची तारीख – 05 डिसेंबर 2020 ते 18 जानेवारी 2021 पर्यंत
प्रवेशपत्रांची तारीख – रॅलीची प्रवेशपत्रे रॅलीच्या तारखेच्या एक आठवड्यापूर्वी तयार केली जातील.
रॅलीची तारीख – 01 फेब्रुवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत (कोविड -19 या साथीच्या आजाराच्या परिस्थितीनुसार रॅलीच्या अचूक तारखांची खात्री केली जाईल.)
BELGAUM Rally notification PDF
देशातील इतर राज्यातील रॅलीच्या माहितीसाठी येTHE क्लिक करा..
Required Documents at the Rally Site(रॅलीवेळी लागणारी कागदपत्रे )
कर्नाटकातील सहा जिल्ह्यांच्या पात्र उमेदवारांसाठी (बेळगाव, बिदर, गुलबर्गा, कोप्पल, रायचूर आणि यादगीर) कर्नाटकातील बेळगाव येथे (01 फेब्रुवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीत सैन्य भरती रॅली घेण्यात येणार आहे. (कोविड -19 या साथीच्या आजाराच्या परिस्थितीनुसार रॅलीच्या अचूक तारखांची खात्री केली जाईल.)
ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असून ते 05 डिसेंबर 2020 ते 18 जानेवारी 2021 पर्यंत नोंदणी सुरु राहील. रॅलीची प्रवेशपत्रे रॅलीच्या तारखेच्या एक आठवड्यापूर्वी तयार केली जातील. Www.joinindianarmy.nic.in वेबसाइटवर उमेदवारांना त्यांच्या लॉग इन आयडीद्वारे ते डाउनलोड करता येतील. प्रवेशपत्रामध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि वेळेवर रॅलीस पोहचणे आवश्यक आहे..