विद्यागम कार्यक्रमात लक्षात ठेवण्याचे मुद्दे….
विद्यागम अंमलबजावणीसंबंधी शासकीय पुस्तिका साठी येथे क्लिक करा…
1. विद्यार्थी आठवड्यातून दोनदाच विद्यागमसाठी
उपस्थित राहतील.
2. फक्त अर्धा दिवस शाळा:
जास्तीत जास्त 15 विद्यार्थी
3.
1 जानेवारी 2021 पासून राज्यातील 10वी व 12वी तसेच 6वी ते 9वी
वर्गांसाठी विद्यागम कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक उपक्रम सुरु होईल.
4.
राज्याच्या कोविड 19 तांत्रिक सल्लागार समितीच्या
शिफारसीप्रमाणे विद्यार्थी शाळेत व विद्यागम कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास
पालकांचे अनुमती पत्र आवश्यक असेल.
5.
अनुमती पत्रात विद्यार्थ्याला कोविड 19 संसर्गाची लक्षणे
नाहीत याचे दृढीकरण द्यावे लागेल.
6.
वसती शाळा व विद्यार्थी वसती गृहातील विद्यार्थी वसतिशाळा
आणि वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या 72 तासांच्या आत कोविड
19 परीक्षेचा अहवाल सादर करावा.
7. शाळा-कॉलेजमध्ये हजेरी बंधनकारक नाही;घरी राहून
ऑनलाईन,Youtube चॅनल किंवा इतर माध्यमांचा वापर करून अभ्यास करावा.
8. शाळा-कॉलेजमध्ये खोल्या निर्जंतुकीकरण करणे आवश्यक
आहे.
9. 15 दिवसांच्या या प्रयोगानंतर इतर इयत्ता सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
Click here to watch live video….
1 जानेवारी 2021
पासून कर्नाटकातील शाळा – महाविद्यालये सुरु होणार – मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांची घोषणा…
कर्नाटकातील शाळा – महाविद्यालये कधी सुरु
होणार याची उत्सुकता सर्वाना लागली होती.शेवटी शाळा – महाविद्यालये सुरु
करण्यासाठी मुहूर्त नक्की झाला आहे.1 जानेवारी 2021
पासून राज्यातील 1ली ते 10वी आणि 12वी वर्ग सुरु करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री
श्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत
घेण्यात आला.1 जानेवारी 2021 पासून 6वी ते 9वी वर्गांसाठी विद्यागम कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक उपक्रम
सुरु ठेवण्यात येणार आहे.तसेच सुरुवातीला 10वी व 12वी वर्ग सुरु करण्यात येणार
आहेत.विद्यार्थ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक असणार आहे.तसेच पालकांचे संमती पत्र आवश्यक
असेल.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन वर्गास उपस्थित राहण्याची
संधी देण्यात येणार आहे.15 दिवसांच्या प्रयोगानंतर इतर वर्ग सुरु करण्याचा निर्णय
घेण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.