क्रिया विशेषण (KRIYAVESHESHAN)




 

क्रिया विशेषण

खालील उदाहरणे वाचून अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा.

1. उद्या शाळेत कार्यक्रम आहे.

2. मी दररोज व्यायाम करतो.

3. ती नेहमी अभ्यास करते.

4. शेतकरी सावकाश जात होता.

5. ती पटापट सर्व कामे करते. 

वरील उदाहरणातील अधोरेखित शब्द क्रियापदाची विशेष माहिती दर्शवितात.वरील उदाहरणातील सर्व अधोरेखित शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात.

क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात.

क्रियापदाला आपण कसा / कशी / कधी हा प्रश्न विचारला की आपणाला जे उत्तर मिळते ते ‘क्रियाविशेषण’ असते.

उदा. 1. शेतकरी सावकाश जात होता.

या वाक्य आपण जर क्रियापद ‘जात होता’ याला ‘कसा’? हा प्रश्न विचारला तर ‘सावकाश’ हे उत्तर मिळते.

2. मी दररोज व्यायाम करतो.

या वाक्यात क्रियापद ‘करतो’ या क्लारियापदा ‘कधी’? हा प्रश्न विचारला तर ररोज‘ हे उत्तर मिळते. 

म्हणून ‘सावकाश’ आणि ‘दररोज हे शब्द क्रियाविशेषण आहेत. 





Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now