KEVALPRAYOGI AVYAY (केवलप्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार )

 


 
AVvXsEitkZTBlWq2E VvLjRuev9j4DynuCBCgOiVHfuPb2wK3Snaw4uTYsddxX6MWz4H0FObQdofdlleoq0ec2Uy9XO9OszHa8JZCZUjx5rMiAXDyLzjlwP58tGhexh6JUzmI5JAP EBWuh4HdWS6sBBCFkdz0zDzWAfLzdyW05BbIvuppSpCtLfi4Q5G3zIUg=w400 h183

केवलप्रयोगी अव्यय / उद्गारवाचक
शब्द

खालील वाक्यांचे वाचन करा.

1. अहाहा! किती सुंदर फूल आहे.

2. अरेरे! त्याचे खूप वाईट झाले की रे तो !

3. अबब! केवढे उंच झाड ही !

4. अरे बापरे!किती मोठा साप हा !

(   !  )  
उद्गारवाचक चिन्ह

वरील वाक्यात अहाहा, अरेरे, अबब, अरे
बापरे या शब्दांतून बोलणाऱ्याच्या मनातील भावना व्यक्त होतात.

जे अव्यय मनातील भावना व्यक्त करतात.त्यांना केवलप्रयोगी
अव्यय किंवा उद्गारवाचक शब्द असे म्हणतात.




 

केवल प्रयोगी अव्ययांचे होणारे प्रकार उदाहरणासह पुढीलप्रमाणे

1. संमति दर्शक – हां, जी, जीहां, ठीक, बराय, अच्छा.

2. मौनदर्शक  – चुप, चिप, गप, गुपचूप, चिपचाप

3. आश्चर्यकारक – आँ, ओहो, अबबू, अरेच्या
अहाहा.

4. प्रशंसादर्शक
शाब्बास
, वाहवा, छान, भले.

5. आनंददर्शक – वा, वावा, वाहवा, अहाहा, ओहो.

6. विरोधदर्शक – छे, छेछे, छट्, हॅट, अहं, ऊहूं.

7. तिरस्कार दर्शक – धिक्, हट्, शी ऽऽ, हत्, हुडुत.

8. संबोधन दर्शक – अरे, अग, अहो,

9. शोकदर्शक – अरेरे, आईगं, हायहाय,




 

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now