लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम

लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम
पृथ्वीची निर्मिती ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली होती आणि सूक्ष्मजीवांच्या रूपात जीवनाच्या अस्तित्वाची सुरुवात ही सुमारे ४.१ अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि त्यातूनच त्याच्या उत्क्रांतीची यात्रा सुरु झाली. आपले वंशज आग पेटवायला शिकले, गट तयार करणे आणि एकत्र राहणे सुरु केले. अशा प्रकारे हजारो वर्ष्याच्या प्रगती नंतर समाजाची संकल्पना जन्माला आली. मग हे समाज वाढू लागले, एकोप्या मुळे दीर्घ काळ जगू लागले, जगाची लोकसंख्या वाढायला लागली. पण अनेक महाभयंकर आजाराने प्रचंड प्रमाणात लोक मरतही असत, जसे प्लेग आदी रोग.
जगाच्या लोकसंख्या वाढीमध्ये १९२० नंतर खूप मोठा बदल दिसला. इथे आपण समजण्याचा प्रयत्न करू की १९२० नंतर असे काय झाले? २० व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली, माणसाची अवजड कामे मशीन्स करू लागली, नाना प्रकारचे शोध याच काळात लागले, गाड्या आल्या, मग टेलिग्राफ आले. विविध प्रकारच्या रोगांवर उपचार आले, व्यवसाय वाढले, जागतिक संपर्क वाढले. या सर्वांच्या फलस्वरूप माणसाचा जीवनकाळ वाढला, मृत्यु दर कमी झाले. वाढत्या समाजाला सपोर्ट करण्यासाठी वाढीव लोकसंख्येची गरज भासू लागली, म्हणून खूप साऱ्या देशांनी बेबी बूमर्सजनरेशन ला पाठिंबा दिला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, जगाची लोकसंख्या अभूतपूर्व दराने वाढू लागली.जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या त्याच्या इष्टतम स्तरापेक्षाही वाढते, तेव्हा ती गंभीर समस्या बनते. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे खालील समस्या निर्माण झाल्या आहेत.
      वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य व वैद्यकीय, स्वच्छता, अन्न आणि इतर अनेक सुविधा जनतेला पुरवताना सरकारला अडचण येते. सरकारी यंत्रने मधला भ्रष्टाचार हा सुद्धा मोठा भाग आहेच, पण एवढ्या प्रचंड जनतेला मूलभूत सुख-सुविधा पोहचवणे सोपे काम नाही आहे. युरोपिअन किंवा अमेरिका देश त्यांच्या नागरिकांना मूलभूत सोयी खूप व्यवस्थित पुरवतात कारण भारताच्या तुलनेत त्यांची लोकसंख्या खूपच कमी आहे. स्वीडन आणि डेन्मार्क या देशातील नागरिक जगातले सगळ्यात आनंदी मानले जातात, या देशांची लोकसंख्या क्रमशः ९९ लाख आणि ५७ लाख इतकीच आहे. अमेरिका देश लोकसंख्येत तिसऱ्या क्रमांकावर येतो पण त्यांची लोकसंख्या ही फक्त ३२.६ करोड आहे, जी भारताच्या लोकसंख्या १/४ च आहे.
वाढत्या लोकसंख्येचे फायदेही असू शकतात, हे तसे ऐकायला विचित्र वाटते पण असं होऊ शकते. प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या ही भारतासाठी एक गंभीर समस्या बनली असती तरी ती एका चांगल्या संधीमध्ये बदलली जाऊ शकते. चला लोकसंख्येचे फायदे किंवा सकारात्मक परिणाम काय आहेत ते जाणून घेवूया…



   भारतात ५०% पेक्षा जास्त जनता वयोवर्ष ३५ खाली आहे, म्हणून भारताला एक तरुण देश ही संबोधलं जात आणी ही एक उत्तम गोष्ट आहे. जपान आणी काही युरोपिअन विकसित देशांमध्ये जवान नागरिक खूप कमी आहेत, कुठलाही देश चालवण्यासाठी तरुण कामगार, नोकरवर्ग, प्रशासन अधिकारी खूप गरजेचे असतात. भारताकडे ते भरभरून आहेत, त्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर अश्या देशांमध्ये खूप चांगल्या नोकऱ्या मिळवू शकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही गोष्ट जाणली आहे, त्यांनी स्किल इंडिया”, “स्टार्टअप इंडिया”, “मेक इन इंडियासारख्या योजना राबवल्या आहेत, यातून भारतीय जनतेला जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे.
– मराठी निबंध अँँप

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now