NMMS परीक्षा विज्ञान प्रश्नसंच – 6

कर्नाटक NMMS विज्ञान सराव प्रश्नसंच – 6
कर्नाटक NMMS विज्ञान सराव प्रश्नसंच – 6
हा प्रश्नसंच कर्नाटक NMMS शिष्यवृत्ती परीक्षेच्या ‘Scholastic Aptitude Test (SAT)’ विभागासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये इयत्ता 7 वी व 8 वी च्या विज्ञान विषयातील ध्वनी, रासायनिक प्रभाव, पेशींची रचना, बल व दाब आणि प्रकाश या घटकांवरील संभाव्य प्रश्नांचा समावेश आहे. नियमित सराव केल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
1. सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत आढळणारा अधातू कोणता?
(A) पारा
(B) ब्रोमीन
(C) कार्बन
(D) आयोडीन
✔ उत्तर: (B) ब्रोमीन
2. मानवी शरीराचे सामान्य तापमान सेल्सिअस मध्ये किती असते?
(A) 98.6°C
(B) 100°C
(C) 37°C
(D) 42°C
✔ उत्तर: (C) 37°C
3. आपाती कोन 45° असल्यास परावर्तन कोन किती असेल?
(A) 90°
(B) 45°
(C) 30°
(D) 60°
✔ उत्तर: (B) 45°
4. पेशींच्या आत्मघातकी पिशव्या कोणत्या अंगकाला म्हणतात?
(A) रायबोझोम्स
(B) लयकारिका
(C) तंतुकणिका
(D) गॉल्गी संकुल
✔ उत्तर: (B) लयकारिका
5. खालीलपैकी कोणते संपर्क बल आहे?
(A) गुरुत्वाकर्षण बल
(B) चुंबकीय बल
(C) घर्षण बल
(D) स्थिर विद्युत बल
✔ उत्तर: (C) घर्षण बल
6. हळदीच्या डागावर साबण पडल्यास रंग लाल होतो कारण साबण _____ असतो.
(A) आम्लधर्मी
(B) आम्लारीधर्मी
(C) उदासीन
(D) क्षार
✔ उत्तर: (B) आम्लारीधर्मी
7. मानवामध्ये ध्वनीची निर्मिती कोणत्या अवयवात होते?
(A) श्वासनलिका
(B) ग्रासनलिका
(C) स्वरयंत्र
(D) फुप्फुस
✔ उत्तर: (C) स्वरयंत्र
8. अतिशय कमी विद्युत प्रवाह तपासण्यासाठी काय वापरतात?
(A) विद्युत बल्ब
(B) LED
(C) फ्युज
(D) MCB
✔ उत्तर: (B) LED
9. एकक कालावधीत कापलेल्या अंतराला काय म्हणतात?
(A) वेग
(B) चाल
(C) विस्थापन
(D) त्वरण
✔ उत्तर: (B) चाल
10. सप्तरषी हे कशाचे उदाहरण आहे?
(A) ग्रह
(B) उपग्रह
(C) तारकासमूह
(D) धूमकेतू
✔ उत्तर: (C) तारकासमूह
11. इंधनाचे अपूर्ण ज्वलन झाल्यास कोणता विषारी वायू तयार होतो?
(A) कार्बन डायऑक्साइड
(B) ऑक्सिजन
(C) कार्बन मोनॉक्साइड
(D) नायट्रोजन
✔ उत्तर: (C) कार्बन मोनॉक्साइड
12. पानफुटी वनस्पतीमध्ये प्रजनन कोणत्या भागातून होते?
(A) मूळ
(B) खोड
(C) पान
(D) फूल
✔ उत्तर: (C) पान
13. 2,4-D हे रसायन कशाचे उदाहरण आहे?
(A) कीटकनाशक
(B) तणनाशक
(C) बुरशीनाशक
(D) खत
✔ उत्तर: (B) तणनाशक
14. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते?
(A) थायरॉक्सिन
(B) ॲड्रेनालिन
(C) इन्सुलिन
(D) टेस्टोस्टेरॉन
✔ उत्तर: (C) इन्सुलिन
15. जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो?
(A) 22 एप्रिल
(B) 22 मार्च
(C) 5 जून
(D) 28 फेब्रुवारी
✔ उत्तर: (B) 22 मार्च
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now