कर्नाटक NMMS विज्ञान सराव प्रश्नसंच – 6
हा प्रश्नसंच कर्नाटक NMMS शिष्यवृत्ती परीक्षेच्या ‘Scholastic Aptitude Test (SAT)’ विभागासाठी तयार करण्यात आला आहे.
यामध्ये इयत्ता 7 वी व 8 वी च्या विज्ञान विषयातील ध्वनी, रासायनिक प्रभाव, पेशींची रचना,
बल व दाब आणि प्रकाश या घटकांवरील संभाव्य प्रश्नांचा समावेश आहे.
नियमित सराव केल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
1. सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत आढळणारा अधातू कोणता?
✔ उत्तर: (B) ब्रोमीन
2. मानवी शरीराचे सामान्य तापमान सेल्सिअस मध्ये किती असते?
✔ उत्तर: (C) 37°C
3. आपाती कोन 45° असल्यास परावर्तन कोन किती असेल?
✔ उत्तर: (B) 45°
4. पेशींच्या आत्मघातकी पिशव्या कोणत्या अंगकाला म्हणतात?
✔ उत्तर: (B) लयकारिका
5. खालीलपैकी कोणते संपर्क बल आहे?
✔ उत्तर: (C) घर्षण बल
6. हळदीच्या डागावर साबण पडल्यास रंग लाल होतो कारण साबण _____ असतो.
✔ उत्तर: (B) आम्लारीधर्मी
7. मानवामध्ये ध्वनीची निर्मिती कोणत्या अवयवात होते?
✔ उत्तर: (C) स्वरयंत्र
8. अतिशय कमी विद्युत प्रवाह तपासण्यासाठी काय वापरतात?
✔ उत्तर: (B) LED
9. एकक कालावधीत कापलेल्या अंतराला काय म्हणतात?
✔ उत्तर: (B) चाल
10. सप्तरषी हे कशाचे उदाहरण आहे?
✔ उत्तर: (C) तारकासमूह
11. इंधनाचे अपूर्ण ज्वलन झाल्यास कोणता विषारी वायू तयार होतो?
✔ उत्तर: (C) कार्बन मोनॉक्साइड
12. पानफुटी वनस्पतीमध्ये प्रजनन कोणत्या भागातून होते?
✔ उत्तर: (C) पान
13. 2,4-D हे रसायन कशाचे उदाहरण आहे?
✔ उत्तर: (B) तणनाशक
14. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते?
✔ उत्तर: (C) इन्सुलिन
15. जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो?
✔ उत्तर: (B) 22 मार्च



