NATIONAL VOTERS’ DAY COMPETITIONS|’राष्ट्रीय मतदार दिन’ निमित्त स्पर्धा

‘राष्ट्रीय मतदार दिन’ निमित्त निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धेचे विषय व माहिती -: 

अधिक तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, भारत सरकारने दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त 25 जानेवारी 2011 पासून याची सुरुवात करण्यात आली आहे .
25 जानेवारी या ‘राष्ट्रीय मतदार दिन’ निमित विविध स्पर्धांचे आयोजन करून मतदार जागृत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.यामध्ये इयत्ता 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्याकरिता निबंध, वक्तृत्व, चित्रकला अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यामध्ये निबंध स्पर्धेकरिता पुढील विषय देता येतील – 

(1) उमेदवार काल आणि आज
(2) महिला मतदारांचे प्रतिनिधित्व 
(3) मी नव्या युगाचा / युगाची मतदार, 
(4) मी माझे मत विकणार नाही, 
(5) मताधिकाराची सक्ती करावी का?
(6) हक्क वंचितांचे मार्ग मताधिकाराचा, 
(7) शहरी मतदारांची अनास्था – कारणे आणि उपाय, 
(8) एका बोटावरच्या शाईची किंमत 
(9) मी मताधिकार बजाविणार कारण…
(10) निवडणूक सुधारणा
(11) मतदार जागृती
(12) सोहळा लोकशाहीचा जागर मताधिकाराचा

या 12 विषयांपैकी एका विषयावर आपले निबंध सादर करु शकतात.

अशा प्रकारे वक्तृत्व स्पर्धेसाठी पुढील विषय देता येतील – 

(1) सक्षम लोकशाहीची पहिली पायरी – मतदार नोंदणी…, 

(2) वर्ग प्रमुख पदाची निवडणूक मी कशी लढवणार, 
(3) माझा नगरसेवक / सरपंच असा हवा, 
(4) मी नगरसेवक / सरपंच झालो / झाले तर, 
(5) मी आमदार झालो / झाले तर, 
(6) माझा आमदार असा हवा, 
(7) मी खासदार झालो तर / झाले तर, 
(8) माझा खासदार असा हवा, 
 (9) एका बोटावरच्या शाईची किंमत, 
(10) मी मताधिकार बजावणार कारण, 
(11) अठराव्या वर्षाची जबाबदारी – 
(12) मतदार जागृत आहे काय? 
(13)महिला उमेदवार सक्षम आहे काय? 
(14)सध्याची निवडणूक प्रक्रिया 


चित्रकला स्पर्धेसाठी A4 आकाराच्या कागदावर – 

(1) 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
(2) स्त्रियांना मतदार नोंदणीचे आवाहन
(3) दिव्यांगांच्या मताधिकाराचे महत्व
(4) तृतीय पंथीयांच्या मताधिकाराचे महत्व आणि आवाहन – 
या 4 विषयांपैकी एका विषयांवर चित्र काढून सादर करावयाचे आहे.

 

राष्ट्रीय मतदार दिन
कन्नड,मराठी,इंग्रजी प्रतिज्ञा
┈┉━❀SmartGuruji❀━┉┈

 

 
Share with your best friend :)