2000 ची नोट: 2000 रुपयांची नोट जमा/बदलण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे..
जेव्हा आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा परत घेण्याची घोषणा केली होती, तेव्हा त्यांनी असेही म्हटले होते की 2,000 रुपयांच्या नोटांची भविष्यातील स्थिती बँकांमध्ये परत केलेल्या/जमा केलेल्या प्रमाणाच्या आधारे निर्धारित केली जाईल.आरबीआयने म्हटले आहे की 31 ऑगस्ट 2023 पर्यंत 0.24 लाख कोटी रुपयांच्या फक्त 2000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. आकडेवारीनुसार, 31 ऑगस्ट 2023 पर्यंत बँकेत जमा केलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 3.32 लाख कोटी रुपये आहे.
रिझर्व्ह बँक अंतिम मुदतीपूर्वी 2000 रुपयांच्या नोटेबाबत काहीतरी नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे. RBI अधिकृत घोषणा केली तर 30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर मानल्या जाणार नसल्याची शक्याता आहे.
2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया –
ज्या लोकांचे बँकेत खाते आहे ते त्यांच्या बँक शाखेला भेट देऊन 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी त्यांच्या खात्याचे तपशील देऊ शकतात.RBI मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की रु. 2000 च्या नोटा बदलण्यासाठी रिक्विजेशन स्लिप किंवा आयडी प्रूफची आवश्यकता नाही.
आरबीआयने असेही म्हटले आहे की बँक खाते नसलेला व्यक्ती देखील कोणत्याही बँकेच्या शाखेत कोणत्याही ओळखपत्राशिवाय रु.2000 च्या नोटा बदलू शकतो.मात्र, 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यावर मर्यादा आहे. एखादी व्यक्ती एकावेळी रु.20,000 च्या मर्यादेपर्यंत रु.2000 च्या नोटा बदलू शकते. 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा मोफत आहे.