ACADEMIC YEAR 2022-23 ENDING WORKS

 

2022-23 शैक्षणिक वर्ष समाप्ती होताना मुख्याध्यापक,शिक्षकांनी पार पाडावयाची जबाबदारी व कार्ये खालीप्रमाणे.–




ACADEMIC YEAR 2022-23 ENDING WORKS





 दि. 31 मार्च 2023 रोजी कर्नाटक शिक्षण विभागाने तात्कालील क्रिया योजना जाहीर केली असून त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षाची समाप्ती दिनांक:10.04.2023 रोजी होणार असून दिनांक:10.04.2023 पूर्वी मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुढील जबादारी व कार्ये पार पाडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

 1. संदर्भ-2 नुसार 5वी आणि 8वीच्या SA-2 मूल्यमापनासह उर्वरित 1ली ते 9वी इयत्तेचा निकाल दिनांक:08.04.2023 रोजी प्राथमिक शाळा आणि दिनांक:10.04.2023 रोजी माध्यमिक शाळा स्तरावर आयोजित करणे आणि जाहीर करणे.पालक सभा आयोजित करणे.

2. शाळेच्या स्थानिक सुट्ट्यांसंबंधी शाळानिहाय तारखा निर्दिष्ट करून जून-2023 च्या पहिल्या आठवड्यात क्षेत्र शिक्षण अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी.


3. 10.04.2023 रोजी चालू शैक्षणिक वर्षाचा शेवट आहे.इयत्ता 1 ली ते 9 वी पर्यंतच्या मूल्यमापन चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.मूल्यांकन पूर्ण केल्यानंतर आणि निकाल 100% गुणांवर एकत्रित केल्यानंतर,नियमानुसार ग्रेड रेकॉर्ड करणे आणि 25.04.2023 पूर्वी SATS पोर्टलवर अपडेट करणे.




4. दिनांक: 14.04.2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्व प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक,सहशिक्षक आणि SDMC/खाजगी शाळांनी संबंधित व्यवस्थापनासह आणि मुलांनी चांगली तयारी करून अनिवार्यपणे साजरी करणे.

5. सन 2023-24 साठी सरकारी शाळांमधील इयत्ता 1 ते 10 पर्यंतच्या सर्व मुलांसाठी मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके आणि खाजगी शाळांची पाठ्यपुस्तके संबंधित तालुक्यांना आधीच पुरविली गेली आहेत,ती पहिल्या टप्प्यात दिनांक: 10.04.2023 पर्यंत संबंधित तालुक्यांतील मुख्याध्यापकांमार्फत मुलांपर्यंत पोहोचविण्यात यावीत आणि नंतर टप्प्याटप्प्याने, शाळेच्या उद्घाटन समारंभात मुलांनी गणवेश परिधान करून पाठ्यपुस्तके घेऊन शाळेत उपस्थित राहतील अशी व्यवस्था करावी.




6. दिनांक:11.04.2023 ते दिनांक:28.05.2023 पर्यंत शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर झाल्यामुळे, शाळेच्या मुख्याध्यापकानी अक्षर दसोह कार्यक्रमांतर्गत शालेय साहित्य आणि कागदपत्रे तसेच मध्यान्ह गरम करण्यासाठी लागणारे साहित्य सुरक्षित ठेवावे व विधानसभा निवडणुक मतदान केंद्र असणाऱ्या शाळांनी आवश्यक सहकार्य करावे.
 
अधिकृत आदेश खालीलप्रमाणे –




Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *