अहिंसेचे पुरस्कर्ते भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…जियो और जिने दो असा संदेश देणारे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित माहितीपर प्रश्नमंजुषा सोडवूया व आपल्या ज्ञानात भर टाकूया..
वर्धमान महावीर -:
वर्धमान महावीरांचा जन्म कुंडल गावात झाला. कुंडल हे वैशाली नगरातील एक गणराज्य होते.त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ व आईचे नाव नाव त्रिशलादेवी होते.वयाच्या तिसाव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून वर्धमान सत्याच्या शोधार्थ निघाला. सत्याच्या शोधार्थ बारा वर्षे भटकत राहिला. उग्र तपसाधना केली. उपवास करून आत्मक्लेष सहन केला. वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्याला दिव्य ज्ञान प्राप्ती झाली. तो सर्वज्ञ झाला. लोक त्यास ‘महावीर’ किंवा ‘जिन’ म्हणजे जिंकणारा. इंद्रिये ताब्यात ठेवणारा असे म्हणू लागले. याप्रमाणे त्याच्या अनुयायांना ‘जैन असे संबोधले जाते.महावीराने आपले उर्वरित जीवन, जवळजवळ तीस वर्षे गंगा यमुनेच्या परिसरात सहाणाऱ्या लोकांना उपदेश करण्यात घालवले. धर्माचा उपदेश करण्याकरिता पश्चिम भारतात त्यांनी भ्रमण केले. बिहारला पावापुरी येथे वयाच्या 72व्या वर्षी त्यांना निर्वाणप्राप्ती झाली.
खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा व आकर्षक सर्टिफिकेट मिळवा..