पांगिरे (बी) येथील विद्यार्थ्यांचे यश…

 पांगिरे (बी) येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश – 




  

 

 

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय उरला नव्हता.त्यामुळे जास्तीत विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाकडे वळले होते.याच ऑनलाईन मार्गाचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या ज्ञान भर पडावी.भारताचा इतिहास समजावा या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे या केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत कर्नाटक शिक्षण विभागामार्फत 5 वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित नॉलेज ऑफ इंडिया क्विझ आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत पांगिरे बी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीचे विद्यार्थी सृष्टी कुमार व्हरवडे आणि चिदानंद लक्ष्मण नलवडे यांनी चिक्कोडी शैक्षणिक तालुक्यात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक कौतुक होत आहे.    

        या विद्यार्थ्यांना पट्टणकुडी सी आर सी प्रमुख एस.ए.कुरळूपे,मुख्याध्यापक जी.बी.कुंभार,शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या SDMC अध्यक्षा संजीवनी कुंभार,उपाध्यक्ष सुहास गिरीबुवा व सर्व SDMC सदस्य यांनी अभिनंदन केले.

2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पहिली ते आठवी प्रवेश सुरु आहे…

 

 

 




 

 

 
पांगिरे बी येथील शाळेत विज्ञान दिन व मराठी भाषा दिननिमित्त विविध कार्यक्रम
उपक्रमाचा आढावा घेणारा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा… कमेंट व लाईक करा..

 

 




 

 

 

 




 

 

 

 










 

Share with your best friend :)