अनेक शब्दसमुहाबद्दल एक शब्द
इयत्ता – आठवी
रणांगणावर लढताना आलेले मरण
– वीरमरण
कर्तव्य पार पाडण्यात नेहमी
जागरूक राहणारा – कर्तव्यदक्ष
कविता करणारी …. कवयित्री
किल्ल्याच्या सभोवतीची भिंत – तट
केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ
खूप मोठा विस्तार असलेला – विस्तिर्ण
स्वतःबद्दल अभिमान असणारा – स्वाभिमानी
स्वर्गातील इंद्राची सुंदर
बाग – नंदनवन
जमीन व पाणी अशा दोन्ही
ठिकाणी राहणारे – उभयचर
ज्याला कोणीही शत्रू नाही
असा – अजातशत्रू
थोड्यावर संतुष्ट असणारा – अल्पसंतुष्ट
दररोज ठरलेला कार्यक्रम – दिनचर्या
दुसऱ्यावर अवलंबून असलेला – परावलंबी
देवापुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप
देवळातील मूर्तीजवळचा आतील
भाग – गाभारा, गर्भगृह
स्वतःचा फायदा न पाहणारा – निस्वार्थी
स्वतःची वस्तू कोणालाही सहज
देणारा –उदार, दिलदार
हत्तीला काबूत ठेवणास – माहूत
हरणासारखे डोळे असणारी – हरणाक्षी, मृगाक्षी, मृगनयना
हिमालयापासून
कन्याकुमारीपर्यंत – आसेतुहिमाचल
पायापासून डोक्यापर्यंत – अपादमस्तक
पाहण्यासाठी आलेले लोक – प्रेक्षक
पहाटे पूर्वीची वेळ – उष: काल
प्राण्याच्या पाठीवर घालायचे
नक्षीदार कापड – झुल
क्षणकाल टिकणारे – क्षणभंगुर
बोलायला व ऐकायला न येणारा – मूक – बधीर
फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण – अन्नछत्र
भाषण करणास – वक्ता
भाषण ऐकणारा – श्रोता
पूर्वी कधीही घडले नाही असे
– अभूतपूर्व,अपूर्व
नाव चालविणारा – नावाडी, नाखवा
नदीतील पाण्याचा उंचावरून
पडणारा प्रवाह – धबधबा, प्रपात
ज्याचा तळ (थांग) लागत नाही
असा – अथांग
उपयुक्त मनोरंजक लिहणारा – साहित्यीक
राजाने मान्यता दिलेला – राजमान्य
माशासारखे डोळे असणारी – मिनाक्षी
SOURCE – इयत्ता आठवी माय मराठी पाठ्यपुस्तक कर्नाटक
इयत्ता – दहावी
अपेक्षा नसताना
घडलेली गोष्ट – अनपेक्षित
कल्पना नसताना
आलेले संकट – घाला
कमी
आयुष्य असलेला – अल्पायुषी, अल्पायू
दगडावर कोरलेले
लेख – शिलालेख
दर
पंधरवाडयाने प्रसिध्द होणारे – पाक्षिक
देवापुढे
सतत जळणारा दिवा – नंदादीप
दररोज ठरलेला
कार्यक्रम – दिनक्रम
केलेले उपकार
जाणणारा – कृतज्ञ
खूप दानधर्म
करणारा – दानशूर
खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
घरदार
नष्ट झालेले आहे असा – निर्वासित
ईश्वर आहे असे
मानणारा– आस्तिक
ठरावीक
काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे – नियतकालिक
मोजता येणार
नाही असे – अगणित, असंख्य
रणांगणावर
आलेले मरण – वीर मरण
योजना आखणारा – योजक
लोकांनी
मान्यता दिलेला – लोकमान्य
व्याख्यान
देणारा – व्याख्याता
कसलीच इच्छा नसणारा – निरीच्छ
अंग राखून काम करणारा – अंगचोर
ऐकायला व बोलायला न येणारा – मूकबधिर
ज्याला आईवडील नाहीत असा – पोरका,अनाथ
ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रधर, चक्रपाणि
माकडाचा खेळ करुन दाखवणारा –मदारी
पूर्वी कधी घडले नाही असे – अभूतपूर्व
मृत्युवर विजय मिळविणारा – मृत्युंजय
ईश्वर नाही असे मानणारा – नास्तिक
कमी वेळ टिकणारा – अल्पजीवी, क्षणभंगुर
केलेले उपकार विसरणारा – कृतघ्न
अनेकातून निवडलेले – निवडक
कष्ट करुन जगणारा –श्रमजीवी,कष्टकरी
जाणून घेण्याची इच्छा – जिज्ञासा