Ganghi Jayanti Quiz..

               मोहनदास करमचंद गांधी (जन्म: २ ऑक्टोबर 1969  – – मृत्यू: ३० जानेवारी 1948) यांना महात्मा गांधी म्हणूनही ओळखले जाते,भारताचे एक प्रमुख राजकीय आणि आध्यात्मिक नेते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते होते. त्यांनी सत्याग्रहाद्वारे अन्यायाविरोधात लढा दिला.

        भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांनाराष्टपिता असा दर्जा देण्यात आला आहे.आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणा-या महात्माजींची जन्म 02 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.

        1888 मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली. १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली.

 1917 मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतक-यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे १९२०-२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, १९३०-३२ दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग, १९४०-४२ दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या सा-यात महात्माजींचे नेतृत्व झळाळून उठले.

९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले.

प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हटले होते, असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता. यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल.

महात्मा गांधीजींबद्दल अधिक माहिती साठी खालील दिलेली प्रश्नमंजुषा सोडवा..

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *