जुलै महिन्यात होणाऱ्या दहावी वार्षिक परीक्षेच्या तयारीसाठी माननीय डी डी पी आय व के एस ई ई बी बेंगळूरू, यांच्यात झूम मिटींगमध्ये सांगण्यात आलेले परीक्षा केंद्राबद्दलचे मुख्य अंश खालीलप्रमाणे –
# मुख्य परीक्षा केंद्रातील प्रत्येक ब्लॉक मध्ये दहा ते बारा विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करावी.
# एका बेंचला एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.
# दोन बेंच मधील अंतर कमीत कमी सहा फूट असावे.
# ब्लॉक मोठा असेल तर बारा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करावी.
# ब्लॉक मध्ये फर्निचर व्यवस्था सूक्त पद्धतीत असावी.
# प्रत्येक मुख्य परीक्षा केंद्रात एक तरी एक्स्ट्रा ब्लॉक असावे.
# प्रत्येक परीक्षा केंद्रात SOP चे सक्तीने पालन करावे.
# प्रत्येक मुख्य परीक्षा केंद्रात कमीत कमी 90 ते 100 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असावी.
# प्रत्येक मुख्य परीक्षा केंद्रातील उपलब्ध ब्लॉक नुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करावी.
# प्रत्येक मुख्य परीक्षा केंद्रात CCTV सक्तीचे नाही.
# सूक्त मूलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या शाळांची च मुख्य परीक्षा केंद्र म्हणून निवड करावी.
# सरकारी व अनुदानित शाळेतील शिक्षक अथवा जेष्ठ शिक्षकांचीच मुख्य अधीक्षक किंवा कस्टोडियन म्हणून नेमणूक करावी.
# सुपरवायझर म्हणून सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांची नेमणूक करावी.
# एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात स्थलांतरासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची पट्टी तयार करावी, व ही माहिती ऑनलाईन भरावी.
# एसएसएलसी विद्यार्थ्यांचे इंटरनल मार्क्स आणि ग्रेड ऑनलाइन दाखल करावे. ती लिस्ट मुख्याध्यापकांनी तयारीत ठेवावी.
# शक्य तितके क्लस्टर मध्येच परीक्षा केंद्र असावे. अशक्य असेल तरच क्लस्टर रहित केंद्र करावे.
# परीक्षा केंद्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी vaccine घेणे सक्तीचे आहे.
# परीक्षा दोन दिवस आहे. पहिल्या दिवशी Core sub दुसऱ्या दिवशी Lang sub ची परीक्षा घेतली जाणार आहे.
# परीक्षेचा कालावधी तीन तासांचा आहे.
# प्रत्येक मुख्य परीक्षा केंद्रासाठी सरकारी शाळेत उपलब्ध असलेले थर्मल स्कॅनर वापरावे. थरमल स्कॅनर कमी पडले तर आरोग्य केंद्राकडून मागवून घ्यावे.
# मुख्य परीक्षा केंद्रांमध्ये योग्य मार्ग आखून घ्यावे.
# दिनांक 7/6/2021 च्या आत परीक्षा केंद्राची प्रस्तावना बोर्डला सुचवावी.