मराठी व्याकरण – अलंकार



मराठी ऑनलाईन व्याकरण टेस्टसाठी येथे क्लिक करा..

*टेस्ट शेवटी दिलेली आहे..* *टेस्ट शेवटी दिलेली आहे..*

१) उपमा:- दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन
केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो.”
 

दोन वस्तूंतील साम्य दाखवण्यासाठी सम,समान,परी,परीस सारख्या शब्दांचा वापरा केल्यास उपमा अलंकार होतो.

२) उत्प्रेक्षा:- उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की)

) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे
लपविणे/ झाकणे)
उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा
सांगितले जाते तेव्हा
अपन्हुतीहा अलंकार
होतो.”
 

४) रूपक:-   उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक              अलंकार होतो.

   ५) अतिशयोक्ती:- अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली           असते तेव्हा
अतिशयोक्ती अलंकार होतो.
 

६) दृष्टान्त:- एखादा विषय पटवून सांगताना दाखला देणे.

उदा:
लहानपण दे गा देवा,
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार

७) अनुप्रास:- एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच
अक्षराची पुनरावृत्ती होऊन

त्यातील नादामुळे
जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते
, तेव्हा अनुप्रास
अलंकार होतो.

उदा:
गडद निळे गडद निळे
जलद भरुनि आले
 

शितलतनु चपलचरण

अनिलगण निघाले

८) चेतनगुणोक्ती:-  जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन
(सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे
, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा चेतनगुणोक्तीहा अलंकार होतो.”

 श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा
शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.



मराठी व्याकरण पुस्तकांसाठी येथे क्लिक करा…

Share with your best friend :)