काही म्हणी व त्यांचे अर्थ वाचून समजून घ्या व शेवटी दिलेली चाचणी सोडवा..
अती तेथे माती- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो.
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा- जो माणूस फार शहाणपणा करायला जातो, त्याच्या हातून काम बिघडते .
अडला हरी गाढवाचे पाय धरी– शहाण्या माणसाला प्रसंगी मुर्खाची विनवणी करावी लागते.
असतील शिते, तर जमतील भुते- आपला भरभराटीचा काळ असला. तर आपल्याभोवती माणसे गोळा हातात.
आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी – जेथे मदतीची खरी गरज आहे. तेथे ती न पोहोचता ती भलत्याच ठिकाणी पोहोचणे आगीतून फुफाट्यात– लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे.
आधी पोटोबा मग विठोबा – आधी स्वत:च्या पोटापाण्याचा ( स्वार्थाचा) विचार करणे व नंतर अन्य (परमार्थाच) काम करणे.
अंथरूण पाहून पाय पसरावे – आपल्या ऐपतीच्या मानानेच खर्च करावा.
आवळा देऊन कोहळा काढणे – किरकोळ वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
आयत्या बिळात (बिळावर) नागोबा – दुसऱ्यांच्या कष्टांवर स्वार्थ साधणे.
आलीया भोगासी असावे सादर – जे नशिबात असेल, ते भोगायला तयार असावे.
आपला हात जगन्नाथ- आपले काम पार पाडण्यासाठी स्वत:च कष्ट सोसणे योग्य ठरते.
आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ? – जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडीदेखील अपेक्षा करणे व्यर्थ
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन -किमान लाभाची अपेक्षा केली असताना, अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे.
इकडे आड, तिकडे विहीर– दोन्ही बाजूंनी सारख्याच अडचणीत सापडणे.
उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग– उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
उचलली जीभ लावली टाळ्याला-काहीच विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे.
उथळ पाण्याला खळखळाट फार– ज्याच्या अगी मुळातच गुण करमी असतात, तो मनुष्य फार बढाई मारतो.
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये.
एका हाताने टाळी वाजत नाही-कोणत्याही भांडणात, भांडणाच्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात.
एक ना धड, भाराभर चिंध्या– एकाच वेळी अनेक कामे केल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.
ऐकावे जनाचे, करावे मनाचे– कोणत्याही कामाबाबत दुसर्यांचे मत घ्यावे; परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे.
कर नाही त्याला डर कशाला?-ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही, त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण न
करावे तसे भरावे – दुष्कृत्य करणार्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच.
कामापुरता मामा -गरजेपुरते गोड बोलणारा, मतलबी माणूस.
काखेत कळसा गावाला वळसा– हरवलेली वस्तु जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे
कानामागून आली आणि तिखट झाली– एखादया व्यवतीपेक्षा दुसरी व्यवती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसर्या व्यक्तीने अल्पावधीतच रयाच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे.
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती– एखादे घोर संकट येऊनही त्यातून सहीसलामत सुटणे.
कावळ्याच्या शापाने गाय (गुरे) मरत नाही (नाहीत)– धद्र माणसाच्या निदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही. त्यांच्या थोरपणात उणेपणा येत नाही.
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ– आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे.
कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभटाची तट्टाणी-अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही.
कोळसा उगाळावा तितका काळाच-दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता, त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात.
कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे (सूर्य उगवायचा) राहत नाही – निश्चित धडणारी घटना, कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
कोंड्याचा मांडा करून खाणे – हलाखीच्या अवस्थेत, आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे.
कोल्हा काकडीला राजी – सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात.
खाई त्याला खवखवे – जो वाईट काम करतो, त्याला मनात धास्ती वाटते.
खाण तशी माती (बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा) – आईवडिलांप्रमाणे मुलांची वर्तणूक असणे.
खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी -एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंया कंगाल स्थितीत जगणे यांपैकी एकाचीच निवड करणे,
खायला काळ, भुईला भार- निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.
गरजवंताला अक्कल नसते– गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते.
गर्वाचे घर खाली– गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो.
गरज सरो, वैद्य मरो- आपले काम संपताच उपकारकर्याला विसरणे,
गर्जेल तो पडेल (वर्षैल) काय ? – केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही.
गाढवाला गुळाची चव काय ?– अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही.
गाव करी ते राव न करी (गाव करील ते राव काय करील ?) – जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात, ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही.
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली- एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे.
गुरुची विद्या गुरुजलाच फळली -एखाद्यचा डाव त्याच्यावरच उलटणे.
गोगलगाय नि पोटात पाय-एखादयाचे खरे स्वरूप न दिसणे.
घरोघरी मातीच्याच चुली -सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच.
चोराच्या मनात चांदणे – आपले दुष्कृत्य उपडकीस येईल, अशी सदैव भीती वाटत राहणे
चोर सोडून संन्याशाला सुळी देणे-अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे.
चोरावर मोर – एखादयाच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे.
जलात (पाण्यात) राहून माशाशी वैर करू नये -जेथे राहायचे तेथील माणसांबरोबर वैरभाव ठेनू नये.
पी हळद नि हो गोरी – कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे.
बळी तो कान पिळी – बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो.
बुडत्याचा पाय खोलात– माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूंनी होऊ लागते.
बैल गेला नि झोपा केला- एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी– प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे.
भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा – तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे.
भित्यापाठी ब्रह्मराक्षस – भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात.
भरवशाच्या म्हशीला टोणगा- ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे.
भीक नको; पण कुत्रा आवर-ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता, उलट संकट ओढवणे,
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात-एखाद्याच्या भावी कर्तवगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो.
मनी वसे ते स्वप्नी दिसे- जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे.
वासरांत लंगडी गाय शहाणी- अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते.
रात्र थोडी सौंगे फार – कामे पुष्कळ; पण ती पार पाडायला वेळ न पुरणे.
दररोज मरे त्याला कोण रडे ?– नेहमीच घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्त्व वाटेनासे होते.
लहान तोडी मोठा घास– आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे.
लेकी बोले, सुने लागे– एकाला उद्देशून, पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
शितावरून भाताची परीक्षा – एखादया वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे.
शेंडी तुटो की पारंबी तुटो- दृढनिश्चय करणे.
सगळे मुसळ केरात– काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे.
साखरेचे खाणार त्याला देव देणार– भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते.
सुंठीवाचून खोकला जाणे– उपाययोजना करण्याअगोदरच संकट दूर होणे.
सुंभ जळला तरी पीळ जात नाही- माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही.
सरड्याची धाव कुंपणापर्यंत– सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यदितच असते.
हाजीर तो वजीर– जो वेळेवर हजर राहील, त्यालाच संधीचा फायदा होईल.
हसतील त्याचे दात दिसतील-चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्याची पर्वा न करणे.
शेरास सव्याशेर– समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे.
सत्तेपुढे शहाणपण नाही- ज्याच्या हाती सत्ता आहे, त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे.
हत्ती गेला नि शेपूट राहिले-कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र-दुसर्याच्या जिवावर स्वतः उदारपणा दाखवणे.
हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे-जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे, ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल
खात्री नाही, ते मिळवण्याचा प्रयत्न करणे.