कर्नाटकातील पात्र अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी (Fresh & Renewal) शैक्षणिक सत्र २०२० साठी आमंत्रित करीत आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी जे कोणत्याही सरकारी/अनुदानित / मान्यताप्राप्त विना अनुदानित शाळा / संस्था मध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत आहेत.असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.केंद्र सरकारने पुरस्कृत केलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील (जैन/मुस्लीम/ख्रिश्चन/शीख/बौद्ध/पारसी) विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – ऑक्टोबर 2020
शिष्यवृत्तीसाठी पात्रता –
Ø कर्नाटकच्या अल्पसंख्याक समुदायातील
विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाच्या अंतिम परीक्षेत 50% पेक्षा जास्त
गुण मिळविले पाहिजेत.
Ø सर्व स्त्रोतांकडून
विद्यार्थ्यांचे आई-वडील / पालक यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख (1,00,000/-) पेक्षा जास्त जाऊ नये.
Ø जर विद्यार्थी अल्पसंख्यांक समुदायातील
(जैन/मुस्लीम/ख्रिश्चन/शीख/बौद्ध/पारसी) नसेल तर प्री-मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी अपात्र असतील.
Ø जे अल्पसंख्यांक समुदायातील
विद्यार्थी कर्नाटकाचे रहिवाशी आहेत पण शिकण्यासाठी उतार राज्यात गेले असतील असे विद्यार्थी कर्नाटकमध्ये प्री
मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
Ø इतर राज्यातील अल्पसंख्यांक
समुदायाचे विद्यार्थी कर्नाटकामध्ये प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी
अर्ज करण्यास अपात्र असतील.