निसर्ग आणि आम्ही
निसर्गाच्या छायेत आपण सतत रहात असतो.निसर्गाचे आणि आपले नाते अतूट आहे.निसर्गाच्या नाशाला सुरुवात झाली की, आपल्याही नाशाला सुरुवात होते. भिंतीवरचा रंग पुसला जातो. मनावर उमटलेला निसर्गाचा गर्द हिरवा रंग कधीच पुसला जात नाही. उलट वय वाढत जातं तसा तसा हा रंग अधिकच गडद होत जातो. अनेक शब्द आपल्या विस्मरणात जातात. पण हिरवा बोलीचा शब्द ओठावर आला की मनासमोर हिरवे गर्द रान दिसते. पाऊस पडत असताना आपण आपल्यालाच विसरत जातो. संध्याकाळी दिवेलागण मनाला हुरहुर लावून जाते. निसर्ग आपल्या तनामनात रुंजी घालत असतो. अशा वेळी सहज एक कविता लिहिली जाते.
फांद्याफांद्यांत गुंतलेले झाड
दिवा घेऊन उभे आहे
ओंजळीची फुले व्हावीत
असे ऋतू हवे आहेत
ऋतुऋतु हसणारे
मन झाडाला हवे आहे
मनामनापलीकडचे
अजून काही हवे आहे
पानावरच्या रेषांना
उद्याचे नकाशे
हवे आहेत
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं..
‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें..’ पाचशे वर्षापूर्वीच तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. झाडांचे आणि आपले जन्मापासून नाते असते. पिंपळ, वड, गुलमोहर, चिंच, चाफा अशा किती तरी झाडांना आपण ओळखत असतो. झाड आपल्याशी बोलत नाही. पण त्याचे तन आणि मन फळाफुलांनी बहरून आलेले असते. झाडांशी आपले नाते जवळकीचे असते. लाजाळूच्या झाडाला आपला स्पर्श झाला की ते स्वत:ला मिटून घेते.

आपला स्पर्श, आपल्या जाणिवा झाडांना कळत असतात. झाड फुलांनी बहरून आले की आपणही बहरून येत असतो. आंब्याला मोहर आला की रान सुगंधाने बहरून जाते. जंगलातून फिरताना झाडांच्या सावल्यांमध्ये हरवून जाणा-या आपल्या सावल्या आपल्यालाच ओळखता येत नाहीत. झाडांवर अनेक कवींनी कविता लिहिल्या आहेत. शांता शेळकेंची ‘झाड’ ही कविता मला आठवते.
झाड
हे एक झाड आहे : याचे माझे नाते
वा-याची एक झुळुक
दोघांवरून जाते
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे
जाणीव ओले भास
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बाळगाणी
याच्या कटिखांदी
मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती
याच्या पानावरच्या रेषा
माझ्या तळहाती
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सल
रुजते आहे झाड
माझ्या रक्ताच्याही पैल
कधी तरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे
जुने गाणे गाईन
नदीच्या अल्याडपल्याड..
हे एक झाड आहे : याचे माझे नाते
वा-याची एक झुळुक
दोघांवरून जाते
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे
जाणीव ओले भास
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बाळगाणी
याच्या कटिखांदी
मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती
याच्या पानावरच्या रेषा
माझ्या तळहाती
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सल
रुजते आहे झाड
माझ्या रक्ताच्याही पैल
कधी तरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे
जुने गाणे गाईन
नदीच्या अल्याडपल्याड..
व्यंकटेश माडगूळकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘ज्याच्या गावी नदी असते त्याचे बालपण समृद्ध असते.’ नदीकाठची संस्कृती समृद्ध असते असे म्हणतात ते त्यामुळे. नदी वाहत असते. पण प्रवाहाबरोबर आपल्यालाही समृद्ध करत असते. गंगा, यमुना, सरस्वती या नद्या आपण पाहिल्या नसल्या तरी या नद्यांशी आपले भावनिक नाते जडलेले असते. ‘काबुलीवाला’ चित्रपटातील गुलजारांचे गाणे आपल्या मनात सतत असते.
ते गाणे ऐकताना गंगेचा प्रवाह, गंगेशी असलेले, नदीशी असलेले आपले नाते अधिकच दृढ होते.
ते गाणे ऐकताना गंगेचा प्रवाह, गंगेशी असलेले, नदीशी असलेले आपले नाते अधिकच दृढ होते.
गंगा आए कहाँ से, गंगा जाए कहाँ रे
लहराए पानी में जैसे, धूप-छाँव रे
रात कारी दिन उजियारा
मिल गए दोनों साए
साँझ ने देखो रंग-रूप के
कैसे भेद मिटाए रे
गंगा आए कहाँ से, गंगा जाए कहाँ रे
लहराए पानी में जैसे, धूप-छाँव रे
काँच कोई, माटी कोई
रंग-बिरंगे प्याले
प्यास लगे तो एक बराबर
जिसमें पानी डाले रे
गंगा आए कहाँ से, गंगा जाए कहाँ रे
लहराए पानी में जैसे, धूप-छाँव रे
लहराए पानी में जैसे, धूप-छाँव रे
रात कारी दिन उजियारा
मिल गए दोनों साए
साँझ ने देखो रंग-रूप के
कैसे भेद मिटाए रे
गंगा आए कहाँ से, गंगा जाए कहाँ रे
लहराए पानी में जैसे, धूप-छाँव रे
काँच कोई, माटी कोई
रंग-बिरंगे प्याले
प्यास लगे तो एक बराबर
जिसमें पानी डाले रे
गंगा आए कहाँ से, गंगा जाए कहाँ रे
लहराए पानी में जैसे, धूप-छाँव रे
आज अनेक नद्या मृतावस्थेत आहेत. नदी मृत होता कामा नये. नदीचे प्रदूषण ही आज गंभीर समस्या होत चालली आहे. नदी आहे तर आपण आहोत. गंगेला, नदीला पवित्र म्हणायचे. नदीला मातेचे रूप द्यायचे आणि नदीच प्रदूषित करून टाकायची हा दांभिकपणा आपण सोडून दिला पाहिजे. नदी स्वच्छ आणि सुंदर ठेवली पाहिजे. तरच आपले जगणे सुंदर होऊ शकते.
निसर्गाच्या छायेत आपण सतत रहात असतो.निसर्गाचे आणि आपले नाते अतूट आहे.
निसर्गाच्या नाशाला सुरुवात झाली की, आपल्याही नाशाला सुरुवात होते. ‘आपण आणि निसर्ग’ जगले पाहिजेत. पाऊस,पाणी,झाडे,पशु-पक्षी यांची ओढ मनाला वाटते. आपण एकटे नाही असे जाणवते. निसर्गाच्या आणि माणसाच्या जन्मापासून निर्माण झालेला हा नात्याचा प्रवास खूप वेगळा आहे. तो समजून घेऊन आपले आणि निसर्गाचे नातेसंबंध उत्कट होणे गरजेचे आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. हाच या संपादनाचा मुख्य गाभा आहे. आपलं जीवन गतिमान बनत चाललेलं आहे. जमिनीवरून दिसणा-या चंद्रावर आपण आपल्या पावलांचे ठसे उमटवले. माणसाच्या बुद्धीची गती अगाध आहे. तिचा अंदाज घेणे कठीण आहे. दिवसेंदिवस आपण अधिकाधिक भौतिक प्रगतीकडे वाटचाल करत असताना आपल्या हातात ओंजळभर बिया हव्यात. त्या रुजत गेल्या की सावल्यांचे रूप आपल्या अवतीभोवती असेल. आपल्या रूपाइतकंच ते रूप महत्त्वाचं आहे. ते रूप ओळखण्याची गरज आहे.

(संकलित- २००६चा ‘ऋतुरंग’चा विशेषांकही ‘निसर्ग आणि माणूस’ )