वाचनाचे महत्व

वाचनाचे महत्व
    सद्याची
अवस्था तर एक प्रकारची कुंठावस्था आहे असे मला वाटते. लहानपणी जुन्यापिढीत
मुलांच्या हातात इसापनीती
, साने गुरूजींच्या संस्कारक्षम गोड गोष्टी, ‘श्यामची आईया सारखी पुस्तके असायची. आताची मुळे सलग
पानभर नाही लिहिलेले असेल तर तेसुद्धा वाचायची तसदी घेत नाही. चित्रांच्या मार्फत
2-2 ओळींची माहिती संकलित केलेलीकार्टून्स त्यांना जास्त आवडतात
, दीर्घ कथा, लघु कादंबरी, मोठी
वैचारिक पुस्तके
, सुंदरकवितांचा संग्रह या गोष्टीय तर
त्यांच्या आजुबाजुला फिरकत सुद्धा नाही.
       अलिकडे हा
वाचन संस्कारच घराघरातून हरवला आहे. अगदी बालवर्गापासून परीक्षा आणि त्यात मिळणारी
टक्केवारी यालाच अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
त्यामुळेपाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अन्य वाचन करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृतीच नष्ट
झाली आहे.पालकही याबाबत उदासीन झाले आहेत. शाळा
, परीक्षा, शिकवणी वर्ग
आणि डॉक्टर किंवाइंजिनिअर बनण्याची दुर्दम्य आकांक्षा त्यातून निर्माण होणारी
जीवघेणी स्पर्धा
, त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाट्टेल
त्या वैध/अवैध मार्गाचा अवलंब या सर्व दुष्चक्रात आताचा पाल्यआणि पालक दोघेही
अडकले आहेत त्यातून वेळ काढून परीक्षा निरपेक्ष
, निखळ आनंद
देणारे वाचन करण्यास त्यांना फुरसतच नाही.

    वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती
प्रबल होते
, कल्पनाशक्तीला वाव मिळतो,रसिकता वाढीस लागते सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता,
दुसर्याीच्या दु:खाची जाणीव,त्यांस आवश्यक
असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. खर्याु अर्थाने मानुषतेचेमूल्य अंगी
बाणते. सामाजिक जाणीव दृढ होते. इतरांबाबत
, समाजाबाबत,
आपली काहीकर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते. माता, पिता, शेजारी, समाज आणि
राष्ट्रापर्यंत आपलीही बांधिलकी आहे याची जाणीव जागृत राहते. मन संकुचित
, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही.ते विश्वात्मक होते.वाचनामुळे माणसाला माणूस
म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय
रहात नाही.

Share with your best friend :)