वृक्षाचे महत्व
वृक्षाचे नाव ऐकताच, एकच गाणे आठवते व ते म्हणजे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी”. परंतु आज हे फक्त गायनातच शिल्लक राहले आहे. निसर्ग आणि पर्यावरण हेच जीवनाचे आधार आहे. वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. संपूर्ण जगात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत. ज्याचे गंभीर परिणाम दिसायला लागले आहेत. आज सर्व प्रदेश, पहाड़, जंगल हे वृक्ष नष्ट झाल्याने ओसाड पड़ले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. या मुळे सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे.
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाई ची समस्या तीव्रतेने जाणवत आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. विकासाच्या नावाखाली जंगलतोड झाल्यामुळे व नवीन वृक्षांचा लागवड न झाल्यामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. शहरात रस्ते दुरूस्ती, रस्तेरुंदी, उंच-उंच इमारतीचे बांधकाम करण्या करता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, ज्यामुळे उष्णतेचा पारा वाढलेला आहे. देशात कित्येक ठिकाणी तापमान ४५° C पेक्षा अधिक पोहचला आहे. म्हणून विकासाच्या योजना आखताना व शहरीकरण करताना मूलभूत सुविधांकडे, पर्यावरण रक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
जंगल तोडी मुळे जंगलातील प्राणीही बेघर होत आहेत. आणि ते मानवी वस्त्यांमध्ये भक्ष व आसरा शोधत आहेत. आणि यामुळे जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. हे थांबवण्याकरिता नागरीकांत वृक्षतोडीचे भयानक परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे. जंगलाची उपयुक्तता व वृक्षा रोपणाचे फायदे याची माहिती नागरिकात पोहचवलीत पाहिजे.
जर सर्व झाडे कापून टाकली, तर पाणीची कमी होईल, तापमान वाढणार, रोगराई पसरणार आणि संपूर्ण पर्यावरण नष्ट झाले तर भविष्यात पृथ्वीचे काय होईल. आणि वुक्षतोडीला जवाबदार ठरणारा मनुष्यच हे सर्व थांबवून सृष्टीला वाचवू शकतो.
– मराठी निबंध अँँप
– मराठी निबंध अँँप



