स्मार्टफोन हँँग होत असेल…फोनची मेमरी फुल्ल झाली असेल तर….!!

स्मार्टफोन हँँग होत असेल तर हे वाचा….
              
         ‘स्मार्टफोन घेतला तेंव्हा तो अगदी नीट चालत होता, पण आता तो हँग होतोय, संथ गतीने चालतोय’; ही काही फार वेगळी आणि विशेष अशी समस्या नाही. प्रत्येक स्मार्टफोनची एक क्षमता असते आणि त्या क्षमतेबाहेर जर आपण त्यावर काम सोपवलं, तर सहाजिकच तो हँग होतो. आपल्याला ताण आल्यानंतर आपलं डोकं जसं हँग होतं, अगदी त्याचप्रमाणे स्मार्टफोनवर ताण आल्यानंतर तो हँग होऊ लागतो. त्याच्यावर कसला ताण आला आहे? हे जर आपण समजून घेतलं, तर आपण त्यावरील ताण मोकळा करु शकतो, जेणेकरुन त्यास पूर्ववत कार्यक्षमतेने काम करणे शक्य होते. यादृष्टीने जर आपल्याला दोन सोप्या गोष्टी व्यवस्थित समजल्या, तर आपला फोन काही मिनिटांतच पुन्हा व्यवस्थित होणे शक्य आहे.
इन्टरनल मेमरीआणि रॅम’ (RAM) हे दोन महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. आपल्या मेंदूमध्ये जसं निरनिराळ्या विषयांचं ज्ञान साठवलेलं असतं, अगदी तसंच इन्टरनल मेमरी मध्ये विविध प्रकारचा डेटा साठवलेला असतो. पण हे सर्व प्रकारचे ज्ञान आपण एकाच वेळी वापरतो का? तर नाही! ज्यावेळी जितक्या ज्ञानाची गरज आहे, आपण त्यावेळी केवळ तितकंच ज्ञान वापरतो. त्याचप्रमाणे इन्टरनल मेमरीमधील सर्व प्रकारचा डेटा हा काही एकाच वेळी उपयोगात येत नाही. ज्यावेळी जितका डेटा गरजेचा आहे, त्यावेळी तितकाच डेटा वापरला जातो.
       आपला स्मार्टफोन एकावेळी किती काम करु शकेल? यासही मर्यादा असते. इन्टरनल मेमरीमध्ये जरी भरपूर डेटा ग्रहण करण्याची क्षमता असली, तरी आपला स्मार्टफोन एकावेळी किती काम करु शकेल? ते आपल्या फोनच्या RAM वर अवलंबून असते. थोडक्यात काय? तर आपल्या फोनची इन्टरनल मेमरीआणि रॅमहे योग्य प्रमाणात रिकामे असणे आवश्यक आहेत. इन्टरनल मेमरीअथवा रॅमजर भरलेली असेल, तर अर्थातच आपल्या स्मार्टफोनवर ताण आहे असे समजण्यास हरकत नाही.
आता बघू या नेमके काय केल्याने इंटर्नल मेमरी रिकामी होऊ  शकते.

        *   फोटोज आणि व्हिडिओज एक्सटर्नल किंवा एसडी कार्डवर सेव्ह करणे हा उपाय तसा सगळ्यांनाच माहित्येय. नवीन मोबाइल घेतल्यानंतर कॅमेराचे सेटिंग बदलणं महत्त्वाचे असते. याचे कारण डिफॉल्ट सेटिंगनुसार कॅमेरातून टिपलेले फोटो आणि व्हिडीओ इंटर्नल मेमरीमध्ये सेव्ह होत असतात.खाली दिलेल्या क्रमाने हे सेटिंग बदलता येईल.कॅमेरा अ‍ॅपमध्ये जाऊन सेटिंग्जवर क्लिक करा. त्यानंतर स्टोअरेजवर क्लिक करून मेमरी कार्ड सिलेक्ट करा म्हणजे काम झाले.     * मीडियाचा मोठय़ा प्रमाणावर वापर होणाऱ्या अ‍ॅप्सची एक यादी बनवा. मीडिया म्हणजे फोटोलोगोव्हिडीओचा कमी-अधिक प्रमाणात वापर करणारे अ‍ॅप्स. उदाहरणार्थ पॉडकॅचर्सम्युझिक शेअरिंग अ‍ॅप्सव्हिडीओ स्ट्रीमिंग अ‍ॅप्सस्ट्रिमिंग रेडिओ अ‍ॅप्सवॉलपेपर डाउनलोडर्स वगैरे. नेमकी कोणती अ‍ॅप्स मीडियाचा वापर अधिक करते याची माहिती Disk Usageसारखी अ‍ॅप्स अचूकपणे देतात. ही अ‍ॅप्स ओळखल्यानंतर त्यांच्या सेटिंग्जमध्ये जायचे. आणि त्या अ‍ॅप्सचा डेटा जिथे सेव्ह होतो ते डिफॉल्ट फोल्डर्स बदलून त्यांना मेमरी कार्डवर हलवायचे. किंवा त्या विशिष्ट अ‍ॅपचा वापर जास्त नसल्यास ते थेट डिलीट करून टाकायचे. *      लॉग्स फोल्डर नावाचा एक प्रकार असतो. एखादी कमांड दिल्यानंतर जी अ‍ॅक्शन होते ती संपूर्ण प्रक्रिया या लॉग फाइल्समध्ये सेव्ह होत असते. हे लॉग फोल्डर्स अनेकदा मोठय़ा साइझचे असतात.प्लेस्टोरमधील DiskUsage अ‍ॅप्च्या मदतीने हे फोल्डर्स शोधता येऊ शकतात. त्यांची साइझ मोठी असेल तर हे फोल्डर्स डिलीट करण्यास काहीच हरकत नाही. कित्येकदा १००-१५० पेक्षा जास्त एमबी इतकी जागा हे फोल्डर्स व्यापून असतात.
    *   जंक फाइल्स आणि कॅश मेमरी वेळच्या वेळी साफ करणं हा उपाय तर आहेच. याशिवाय वापरात नसलेली अ‍ॅप्स डिलीट करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. पण यापेक्षा आणखी एक गोष्ट करता येण्यासारखी आहे. ती म्हणजे ब्लोटेड कॉण्टॅक्ट्स स्टोअरेज बग नावाचा एक प्रकार असतो. गुगलशी संलग्न झालेली कॉण्टॅक्ट लिस्ट अनेकदा मोबाइलवरची जागा व्यापते. अशा वेळी काळजीपूर्वक सर्व कॉण्टॅक्ट्सचा व्यवस्थित बॅकअक घ्यावा. हा बॅकअप दुसऱ्या एखाद्या डिव्हाइसवर तसेच क्लाउडवरही ठेवावा. आणि मोबाइलवरील कॉण्टॅक्ट्स फॉरमॅट करावेत. जेणेकरून हा बग दुरुस्त होतो. इतकेच नाही तर अनेकदा १५० एमबीपेक्षा जास्त जागा रिकामी होते. हे सगळे झाल्यानंतर कॉण्टॅक्स्ट पुन्हा सेव्ह करायला विसरू नका.

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now