इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
भाग – 1
स्वाध्याय
Chapter 2 – Bharat Varsha Geographical Features and History Prehistory of India
प्रकरण 2 – भारत वर्ष भारताची भौगोलिक वैशीष्ट्ये आणि इतिहास पूर्वकाळ
महत्त्वाचे मुद्दे:
- भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये: भारत एक द्वीपकल्प असून आशिया खंडाचा दक्षिण भाग व्यापलेला आहे. त्याच्या शेजारी पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार हे देश आहेत.
2. इतिहासपूर्व काळ: लेखनकलेच्या शोधापूर्वीचा काळ म्हणजे इतिहासपूर्व काळ. त्यावेळी माणूस शिकार आणि अन्न गोळा करण्यात व्यस्त होता.
3. पाषाणयुग: दगडी हत्यारे वापरण्याच्या काळाला पाषाणयुग म्हटले जाते. यात तीन कालखंड होते – प्राचीन अश्मयुग, मध्य अश्मयुग, नवीन अश्मयुग.
4. मानवाचा विकास: मानवाने पशुपालन आणि दुग्धोत्पादनाचा प्रारंभ केला, तसेच मच्छिमारी आणि शेती शिकला.
5. अग्निचा वापर: कर्नूलच्या गुहांमध्ये राखेचे अंश आढळल्याने मानवाला अग्नि वापरण्याचे ज्ञान होते, हे सिद्ध होते.
6. चित्रकला: पाषाणयुगातील गुहामध्ये अनेक चित्रे आढळतात, ज्यामध्ये जंगली प्राणी आणि शिकारीचे दृश्ये आहेत.
7. मध्य पाषाणयुगातील शस्त्रे: हाड-लाकडाच्या शस्त्रांना नाजूक दगडी शस्त्रांनी सुशोभित केले जात असे.
स्वाध्याय
1. योग्य शब्द वापरून गाळलेल्या जागा भरा :
1. भारत एक द्वीपकल्प आहे.
2. राखेचे अंश कर्नूल या गुहेत आढळले आहेत.
3. मध्यपाषाणयुगातील शस्त्रांना नाजूक दगडी शस्त्रे म्हटले जात.
II. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :
4. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर – भारत एक द्वीपकल्प आहे आणि त्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे. यामध्ये हिमालय पर्वतरांगा, गंगेची सुपिक मैदाने, दख्खनचे पठार आणि विस्तृत किनारपट्टी आहेत.
5. कोणत्या खिंडीतून भारतावर आक्रमणे झालेली आहेत?
उत्तर – भारतावर हिमालयातून खैबर आणि बोलन खिंडीतून आक्रमणे झालेली आहेत.
6. इतिहासपूर्व काळ म्हणजे काय?
उत्तर – लेखनकलेच्या शोधापूर्वीचा काळ म्हणजे इतिहासपूर्व काळ. या काळातील पुरावे लिखित स्वरूपात उपलब्ध नसल्यामुळे, त्याचा अभ्यास पुरातत्त्व संशोधकांनी केलेल्या शोधांवर आधारित आहे.
7. पशुपालन आणि दुग्धोत्पादनाची कशी सुरुवात झाली?
उत्तर – मानवाने प्राण्यांचे निरीक्षण करून त्यांना माणसाळवले. नंतर त्याने शेळ्या, मेंढ्या आणि अन्य प्राण्यांचे पालन सुरू केले आणि दुग्धोत्पादनाचा व्यवसाय उभारला.
8. इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडाला पुरातत्त्व संशोधकांनी वेगवेगळी नावे दिली आहेत, ती कोणती?
उत्तर – प्राचीन पाषाणयुग, मध्य पाषाणयुग, आणि नवीन पाषाणयुग अशी नावे दिली आहेत.