7th Science Question Answers 10.Electric Current and its effects |10.विद्युत प्रवाह आणि त्याचे परिणाम

इयत्ता – सातवी

विषय – विज्ञान 

माध्यम – मराठी 

स्वाध्याय 

अभ्यास
1. विद्युत मंडलातील पुढील घटकांची संकेत चिन्हे काढा. जोडलेल्या तारा, बंद स्थितीतील स्विच, बल्ब, विद्युत घट, चालू स्थितीतील स्विच, बॅटरी.

उत्तर –

image 23

2. चित्र 10.21 मध्ये दाखविलेल्या विद्युत मंडलाची रेखाकृती काढा.

उत्तर –

image 28
image 25

3. चित्र 10.22 मध्ये दाखविल्याप्रमाणे चार घट एका बोर्डवर बसविलेले आहेत. चार घटांची बॅटरी तयार करण्यासाठी तारेने त्यांची अग्रे जोडावयाची आहेत. ती कशी जोडायची रेषा मारुन दाखवा.

image 26

उत्तर –

image 27

4. चित्र 10.23 मध्ये दाखविलेला बल्ब पेटलेला नाही. त्याचे कारण शोधू शकाल? बल्ब प्रकाशीत होण्यासाठी आवश्यक तो बदल करून आकृती पुन्हा काढा.

उत्तर : जेव्हा विद्युत घट एकसंध जोडणीमध्ये योग्य प्रकारे जोडले जातात, तेव्हा एका घटाचे धनाग्र दुसऱ्या घटाच्या ऋणाग्राला जोडले पाहिजे. मात्र, चित्रात दोन घटांचे धनाग्र एकमेकांना जोडले आहेत, त्यामुळे बल्ब पेटलेला नाही. बल्ब प्रकाशित होण्यासाठी सुधारित आकृती तयार करावी. 

 5. विद्युत प्रवाहाचे दोन परिणाम सांगा.

उत्तर: 

1. विद्युत प्रवाहामुळे उष्णता निर्माण होते. 

2. विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. 

6. तारेमधून विद्युत प्रवाह जावू दिल्यास तारे जवळ ठेवलेली दक्षिणोतर स्थिर असलेली चुंबक सूची विचलित होते. स्पष्ट करा.

उत्तर: चुंबकीय सुची ही लघु चुंबक आहे, जी नेहमी उत्तर-दक्षिण दिशा दर्शवते. विद्युत तारामधून प्रवाह गेल्यास विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होते. या परिणामामुळे चुंबकीय सुची विचलित होते. 

7. चित्र 10.24 मध्ये दाखविलेल्या विद्युत मंडलातील स्विच बंद असल्यास चुंबक सूची विचलित होईल का?

उत्तर: नाही,कारण या मंडळात बॅटरी किंवा विद्युत घट नाही. त्यामुळे मंडळातून विद्युत प्रवाह वाहणार नाही. 

8. रिकाम्या जागा भरा: 

(a) विद्युत घटाच्या संकेत चिन्हामधील लांब रेषा त्याचे धन अग्र दर्शविते.

(b) दोन किंवा अधिक विद्युत घटांच्या जोडणीला बॅटरी असे म्हणतात.

(c) विद्युत हिटरचे स्विच चालू केले असता त्यातील तापकतंतू  हा भाग लाल होवून उष्णता उर्त्सर्जित करतो.

(d) विद्युत प्रवाहाच्या औष्णीक परिणामावर आधारित असलेल्या सुरक्षिततेसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला फ्यूज असे म्हणतात.

9. खालील विधाने बरोबर की चूक ओळखा :

(a) दोन विद्युत घटांची बॅटरी तयार करण्यासाठी एका विद्युत घटाचे ऋणाग्र दुसऱ्या विद्युत घटाच्या ऋणाग्राला जोडतात. (बरोबर / चूक)


उत्तर → चूक 


(b) एका विद्युत तारिणीमधून विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त दाबाचा विद्युत प्रवाह वाहल्यास तार वितळून तुटते. बरोबर / चूक)


उत्तर  → बरोबर 


(c) लोखंडाचा तुकडा विद्युत चुंबकाकडे आकर्षिला जात नाही. (बरोबर / चूक)


उत्तर  → चूक 


(d) विद्युत घंटेमध्ये विद्युत चुंबक बसविलेला असतो. (बरोबर / चूक)

उत्तर  → बरोबर 

10. विद्युत चुंबक कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून प्लास्टीक पिशव्या वेगळे करण्यासाठी वापरला जाऊ शकतो असे तुम्हाला वाटते का? स्पष्ट करा.

उत्तर: नाही, कारण विद्युत चुंबक फक्त लोखंडी वस्तूंना आकर्षित करतो. 

11. एक इलेक्ट्रीशियन तुमच्या घरामध्ये विद्युत दुरुस्तीचे काम करतो आहे. तो विद्युत तारिणी काढून त्याजागी साधी तार वापरु इच्छितो. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? कारण सांगा.

उत्तर: मी सहमत नाही. साधी तार वापरल्यास जास्त प्रवाह गेल्यास ती वितळत नाही. यामुळे आग लागण्याचा धोका असतो. 

12. चित्र 10.4 मध्ये दाखविल्याप्रमाणे विद्युत घट धारकाचा (सेल धारक) वापर करुन जूबेदा एक विद्युत मंडल बनविते. जेव्हा तीने स्विच चालू केले तेव्हा बल्ब पेटला नाही तुम्ही विद्युत मंडलातील दोष ओळखण्यासाठी जूबेदाला मदत करा.

उत्तर: 

1. घट धारकात घट योग्य प्रकारे बसवले आहेत का ते तपासा. 

2. तारा घट्ट जोडल्या आहेत का तपासा. 

3. बल्ब खराब नाही ना हे तपासा. 

4. बॅटरीतील घट संपले नाहीत याची खात्री करा. 

13. चित्र 10.25 मधील विद्युतमंडलामध्ये

(a) स्विच बंद असताना बल्ब पेटेल का?

उत्तर नाही. 

(b) जेव्हा स्विच चालू असते तेव्हा बल्ब A, B आणि C याचा प्रकाशित होण्याचा क्रम काय असेल?

उत्तर स्विच चालू केल्यावर बल्ब A, B, आणि C एकदमच प्रकाशित होतील.

Share with your best friend :)