6वी समाज विज्ञान
21.राष्ट्रीय चिन्हे आणि राष्ट्रीय दिन
इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2024 सुधारित
विषय – स्वाध्याय
पाठ 21.राष्ट्रीय चिन्हे आणि राष्ट्रीय दिन
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा:
- आपल्या राष्ट्रध्वजातील पांढरा रंग सत्य आणि शांती चे प्रतीक आहे.
- राष्ट्रीय गीत बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले.
- मैसूरु राज्याचे कर्नाटक असे 1973 मध्ये नामकरण करण्यात आले.
- लाल किल्ल्यावर पंतप्रधान हे ध्वजारोहण करतात.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- राष्ट्रीय चिन्हे कोणकोणती आहेत?
- भारताची राष्ट्रीय चिन्हे ही
- राष्ट्रध्वज
- राष्ट्रगीत
- राष्ट्रीय गीत
- राष्ट्रचिन्ह
- राष्ट्रीय प्राणी (वाघ)
- राष्ट्रीय पक्षी (मोर)
- आणि राष्ट्रीय फूल (कमळ) आहेत.
2. राष्ट्रध्वज संहितेमध्ये कोणते अंश आहेत?
- राष्ट्रध्वज मलीन किंवा फाटका असू नये.
- केशरी रंग नेहमी वरच्या बाजूला असावा.
- ध्वज उंचावर फडकवावा; दुसऱ्या कोणत्याही ध्वजापेक्षा उंच असावा.
- सूर्योदयानंतर ध्वजारोहण करावे आणि सूर्यास्तानंतर उतरवावे.
- प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर टाळावा.
3. राष्ट्रीय सण कोणकोणते?
- 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
- 15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
- 2 ऑक्टोबर – गांधी जयंती
4. शाळेत आचरण करण्यात येणाऱ्या विशेष दिनोत्सवांची नावे लिहा.
- आंबेडकर जयंती (14 एप्रिल)
- शिक्षक दिन (5 सप्टेंबर)
- बाल दिन (14 नोव्हेंबर)
- संविधान दिन (26 नोव्हेंबर)