6th SCIENCE Question Answers 6. Living things and their surroundings सजीव आणि त्यांच्या सभोवतालचा परिसर

इयत्ता – सहावी

विषय – विज्ञान 

माध्यम – मराठी 

स्वाध्याय 

❇️ज्या प्रदेशातील ठिकाणामध्ये वनस्पती, प्राणी आणि अन्य इतर जीव राहतात, ठिकाणाला त्याचे वासस्थान / निवासस्थान असे म्हणेतात.

❇️प्राणी एकाच निवासस्थानात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी ए एकत्र राहू शकतात.

❇️ वनस्पती आणि प्राण्याचे विशिष्ट गुणधर्म व स्वभाव जे त्यांना एका विशिष्ट निवासस्थानात राहण्यास अनुकूल ब बनवितात. त्याला अनुकूलन असे म्हणतात.

❇️निवासस्थाने अनेक प्रकारची असतात, परंतू सामान्यपणे त्याना भूनिवासस्थान आणि जलनिवासस्थान मध्ये वर्गीकरण केले जाते.

❇️विविध निवासस्थानात सजीवांच्या विविध प्रजाती दिसून येतात.

❇️वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव संयुक्त रूपाने जैविक घटकाबनवितात.

❇️खडक, माती, हवा, पाणी, प्रकाश आणि तापमान आमच्या प्रदेशातील काही अजैविक घटक आहेत.

❇️सजीवांचे काही सामान्य गुणधर्म आहेत त्याना आहाराची गरज असते, श्वसन उत्सर्जन, प्रेरणेला प्रतिसाद, पुनरुत्पादन, वाढ आणि हालचाल करतात.

1: निवासस्थान म्हणजे काय?
उत्तर -:
ज्या परिसरात सजीव राहतात, त्याला निवासस्थान म्हणतात. सजीवांना त्यांच्या अन्न, निवारा, हवा आणि इतर गरजांसाठी निवासस्थानावर अवलंबून राहावे लागते.

2. निवडुंग वाळवंटामध्ये जगण्यासाठी कशाप्रकारे अनुकूलन करतात?
उत्तर -:
वाळवंटात पाण्याचा तुटवडा आणि प्रचंड उष्णता असते. मोठी पाने असतील तर झाडांचे पाणी बाष्पीभवनाद्वारे लवकर निघून जाईल. म्हणून निवडुंगाचे पान काट्यांमध्ये रूपांतरित झाले आहे, ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. निवडुंगाचे खोड जाडसर व मेणाच्या थरांनी झाकलेले असते, ज्यामुळे पाणी टिकवून ठेवले जाते.

3. रिकाम्या जागा भरा.
a) वनस्पती आणि प्राण्यांमध्ये दिसून येणारे विशिष्ट गुणधर्म जे त्याना विशिष्ट वासस्थानात राहण्यास योग्य बनवितात, त्याला अनुकूलन म्हणतात.

b) जमिनिवर दिसून येणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या निवासस्थानाला भू निवासस्थान असे म्हणतात.

c) पाण्यात वास करणाऱ्या वनस्पती आणि प्राण्याच्या निवासस्थानाला जल निवासस्थान असे म्हणतात.

d) माती, पाणी आणि हवा हे अजैविक घटक आहेत.

e) आपल्या प्रदेशात बदलानुसार आम्ही जी प्रतिक्रिया दर्शवितो त्याला उद्दीपन असे म्हणतात.

4. खालील सूचीमध्ये कोणत्या वस्तू निर्जीव आहेत?
नांगर, आळंबी, शिलाई मशीन, रेडिओ, होडी, जलकुंभ, गांडूळ.
उत्तर -: निर्जीव वस्तू: नांगर, शिलाई मशीन, रेडिओ, होडी, जलकुंभ.

5. एका अशा निर्जीव वस्तूचे उदाहरण द्या ज्यामध्ये सजीवांचे दोन गुणधर्म दिसून येतील ?
उत्तर -:

ढग: ढग आकाराने मोठे होतात आणि जागा बदलतात. वाढ आणि हालचाल ही सजीवांची वैशिष्ट्ये त्यांच्यात दिसून येतात, तरीही ते निर्जीव आहेत.

मोटारसायकल: मोटारसायकल हवा घेत आणि बाहेर सोडत हालचाल करते. श्वसन आणि हालचाल या सजीव गुणधर्मांसारख्या क्रिया करूनही ती निर्जीव आहे.

6. खालीलपैकी कोणती निर्जीव वस्तू एकेवेळी सजीवाचा भाग होती? लोणी, कातडी, माती, लोकर, विद्युत बल्ब, खाद्यतेल, मीठ, सफरचंद, रबर,लोणी, कातडी, माती, लोकर, बल्ब, खाद्यतेल, मीठ, सफरचंद, रबर?
उत्तर -: लोणी, कातडी, लोकर, खाद्यतेल, सफरचंद, आणि रबर हे सर्व कधीकाळी सजीवांचा भाग होते.

7. सजीवांच्या काही सामान्य गुणधर्माची यादी करा.
उत्तर -:


1. आहार

2. वाढ

3. श्वसन

4. पुनरुत्पादन

5. प्रेरणेला प्रतिसाद

6. उत्सर्जन

7. हालचाल

8. अनुकूलन

8. गवताळ प्रदेशात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वेगवान हालचालीची का आवश्यकता आहे?
(सूचना : गवताळ निवासस्थानामध्ये लपण्यासाठी वृक्षांची संख्या खूप कमी असते.)
उत्तर -: गवताळ प्रदेशात मोठ्या झाडांची संख्या कमी असल्याने लपण्यासाठी जागा उपलब्ध नसते. अशा ठिकाणी सिंह आणि वाघ हे मांसाहारी प्राणी राहतात, तर हरणासारखे शाकाहारी प्राणी त्यांचा भक्ष्य असतात. सिंहाच्या तपकिरी रंगामुळे तो गवतामध्ये लपतो. त्यामुळे प्राण्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फक्त वेगाने पळणे हा एकमेव पर्याय असतो.

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *