इयत्ता – आठवी मुल्यांकन परीक्षा 2024
नमुना प्रश्नपत्रिका -2
कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (K.S.Q.A.A.C.) 2023-24 मधील राज्य अभ्यासक्रमाच्या सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील 5वी,8वी आणि 9वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन (SA-2) आयोजित करण्यात येणार आहे.KSQAAC द्वारे आयोजित सदर मूल्यमापनाचे अंतिम वेळापत्रक कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे.तसेच या परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका देखील नुकत्याच प्रकाशित करण्यात आल्या आहेत.या प्रश्नपत्रिकावर आधारित सराव टेस्ट आम्ही देत आहोत..
इयत्ता – आठवी
विषय – मराठी (प्रथम भाषा)
गुण – 50
वेळ – 2.30 तास
नमुना प्रश्नपत्रिका
I. खालील प्रश्नांची योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. 16×1=16
1.अं, अ: यांना काय म्हणतात?
A. दीर्घ स्वर
C. सजातीय स्वर
B. –हस्व स्वर
D. स्वरादी
2. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना हवा योडी नाकातून व थोडी
मुखातून बाहेर फेकली जाते.त्या वर्णाला अनुनासिक म्हणतात तर खालीलपैकी अनुनासिक
व्यंजन कोणते?
A. ल
B. म
C. च
D. फ
3. जो अभ्यास करतो तोच पास होतो.या वाक्यातील ‘जो‘ या शब्दाची जात कोणती?
A. सामान्य नाम
B. विशेषण
C. संबंधी सर्वनाम
D. गुण विशेषण
4. केलेले उपकार जाणणारा –
A. कृतघ्न
B. कृतज्ञ
C. स्वार्थी
D. परावलंबी
5. जे चकाकते ते सोने नसते. हे मिश्र वाक्य आहे. तर आरतीने
निबंध लिहिला. या वाक्याला केवल वाक्य का म्हणतात?
A. हे प्रधान वाक्य आहे.
B. या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय आहे.
C. या दोन किंवा अधिक केवल वाक्ये आहेत.
D. त्यात दोन मिश्र वाक्ये आहेत.
6. दुष्काळात…….. महिना.
A. अकरावा
B. दहावा
C. बारावा
D. तेरावा
7.प्रमाण मराठीमध्ये ‘पगा‘ याला पहा म्हटले जाते तर ‘बेसन‘ याला
काय म्हणतात-
A. झुणका
B. भजी
C. भाजी
D. भात
8.एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख वरील
ओळीमधील ‘सुरेख‘
या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
A. सुंदर
B. प्रिय
C. कुरूप
D. दुःख
9. आज लवकर चंद्रोदय झाला. या वाक्यातील ‘चंद्रोदय‘ या शब्दाची संधी अशी सोडवतात –
A. चंद्रा + उदय
B. चंद्र + उदय
C. चंद्रो + उदय
D. चं + द्रोदय
10. उमेश ही संधी उमा+ईश अशी सोडवतात तर ‘महेश‘ ही संधी कशी सोडवतात –
A. म+ हेश
B. महा+ ईश
C. मही+ ईश
D. महा + एश
11.माझी चिंगी काळी आहे? वरील वाक्यात प्रश्नचिन्ह
आहे तर. ‘शहाणी होईल बबी माझी‘
या वाक्यात कोणते विरामचिन्ह आहे –
A. पूर्ण विराम
B. स्वल्पविराम
C. एकेरी अवतरण
D. उद्गारवाचक चिन्ह
12. दादाला सांगा की,पाहुणेबोवाला धर्मशाळेत
कामाला ठेवू नये. या वाक्यातील ‘दादा‘ या
शब्दाचे लिंग ओळखा.
A. पुल्लिंगी
C. नपुंसकलिंगी
B. स्त्रीलिंगी
D. परलिंगी
13. गोपाळकाला पाहण्यासाठी आकाशात देव विमानात बसून आले आहेत.या वाक्यातील ‘देव‘ या शब्दाचे वचन कोणते?
A. एकवचन
B. बहुवचन
C. अनेकवचन
D. वचन
14. मी कलेक्टर होणार आहे. वरील वाक्याचा काळ हा आहे
A. वर्तमानकाळ
B. भूतकाळ
C. भविष्यकाळ
D. साधा भविष्यकाळ
15. म्हणे भोज्यांच्या परवडी । सवंगडी आणिती तातडी |
वरीळ ओळीतील सवंगडी या
शब्दाचा समानार्थी शब्द हा होतो –
A. संग
B. मित्र
C. गोपाळ
D. श्रीकृष्ण
16. गौरीची आई धायमोकलून रडू लागली. वरील वाक्यातील ‘धायमोकलून रडणे‘ या वाकप्रचाराचा अर्थ असा
होतो –
A. मोठ्याने ओरडणे
B. मोठ्याने रडणे
B. आनंद होणे
D. मोठ्याने हसणे
II. एका वाक्यात उत्तरे लिहा – 4×1=4
17. लेखिकेने कोणता चित्रपट पाहिला?
18. झाडांवर कलकलाट कोण करतात?
19. केतकीच्या झाडात काय जन्मते?
20.’तिर्थस्वरुप‘ हा मायना पत्र लिहिताना
कोणासाठी वापरतात?
III. खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा. 6×2=12
21.गजानन दिगंबर माडगूळकर (1919-1977) प्रसिद्ध
कवी, कथाकार, कादंबरीकार,
पटकथा लेखक, जोगिया, चैत्रबन, गीतरामायण
इत्यादी काव्यसंग्रह,
‘आकाशाची फळे‘ ही कादंबरी, ‘वाटेवरच्या
सावल्या‘ हे आत्मचरित्र मराठमोळ्या जीवनाचे विविधरंगी चित्रण, उत्कट
भावनाशीलता, प्रसय रसाळ आणि नाट्यपूर्ण शैली ही लेखन वैशिष्ट्ये, गीतरामायणाच्या
रचनेनंतर ‘आधुनिक वाल्मिकी‘
म्हणून ओळखले जाऊ लागले. लागले.
1. पूर्ण नाव व कालखंड –
2. काव्यसंग्रह –
3. कादंबरी
4. आत्मचरित्र –
5. प्रसिध्द साहित्य कृती –
22.कोणत्याही कामाची ही तीन अंगे आहेत. काम जाणून केले पाहिजे, नेटके
केले पाहिजे,
वेगाने केले पाहिजे. हे तिन्ही गुण साधले म्हणजे काम साधले.
वरील उत्ताऱ्यातील ” काम कधी साधले असे म्हणावे?” संदर्भ सहित स्पष्टीकरण करा.
23. खालील चित्राच्या आधारे या ऐतिहासिक वस्तूचे नाव काय? ही
वास्तू कोठे आहे?
24.खालील चित्राच्या आधारे वैकुंठीचा राया कोण आहे? पुंडलिकास
वर देणारा कोण आहे?
25. मुलाला सांभाळतो तसे त्या बैलांना सांभाळायचे!
वरील ओळीतील अलंकार ओळखून लक्षण लिहा.
26. वृत्त विचारांमध्ये अनुस्वार असेल तर ते अक्षर काय म्हणतात? कवितेतील
शेवटचे अक्षर काय मानतात?
IV. खालील प्रश्नांची उत्तरे तीन-चार वाक्यात लिहा. 3×3=9
27. लेखकाने कोणती निसर्ग शोभा पाहिली?
28. साधूच्या घरातील माणसे उदार असतात हे सांगण्यासाठी
गाडगेबाबांनी कोणती उदाहरणे दिली आहेत?
29. खाली चित्र पाहून भाऊराया या कवितेचा थोडक्यात भावार्थ
लिहा.
V. खालील प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा वाक्यात लिहा
1×4=4
30. शस्त्र,शास्त्र मिळवूनही माणूस हताश का झाला?
VI. खालील मुद्दयाच्या आधारे पत्र लेखन पूर्ण करा –1×5=5
31. खेळाचे महत्व पटवून देणारे पत्र लहान भावाला लिहा.
इयत्ता 5वी,8वी,9वी मुल्यांकन 2024 संबंधी महत्वाच्या लिंक