KALIKA BALAVARDHANE 4TH MARATHI अध्ययन निष्पत्ती क्र. 5

KALIKA BALAVARDHANE

विद्यार्थी कृती पुस्तिका

इयत्ता – 4थी

विषय – माय मराठी

अध्ययन निष्पत्ती क्र. 5

ऐकलेल्या साहित्य कृतींची सामग्री, घटना, प्रतिमा, वर्ण, शीर्षक यांचा बद्दल बोलतात आणि त्यांची मते व्यक्त करतात.

नमुना उत्तरे

    वर्गात घेतलेले ज्ञान विद्यार्थी त्यांच्या रोजच्या परिस्थितीत वापरू शकतील वर्गातील प्रक्रिया विद्यार्थी केंद्र असाव्यात आणि त्यांनी घेतलेले ज्ञान प्रतिबिंबित व्हावे.जे शिकले ते व्यवहारिक परिस्थितीत लागू करण्यात सक्षम असावे अशा उद्देशाने ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित ही कृतीपुस्तिका रचण्यात आली असून या कृती पुस्तिकेचे नमुना उत्तरे देताना आम्हाला आनंद होत आहे ही उत्तरे आपणास उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा..

(सदर उत्तरे हि फक्त नमुन्यासाठी असून आपण आपल्या मताने याची उत्तरे बदलू शकता.)

अध्यपन निष्पत्ती क्रमांक – 5

ऐकलेल्या साहित्य कृतींची सामग्री, घटना, प्रतिमा, वर्ण, शीर्षक यांचा बद्दल बोलतात आणि त्यांची मते व्यक्त करतात.

पाठाचे नावः शेतकरी गीत, माझे गाव, बारा महिने, स्वच्छता गीत.






• पंचांगातील बारा महिन्यांमध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या सणांची यादी दिली आहे. ते सण कोणकोणत्या महिन्यात येतात ते योग्य ठिकाणी लिहा.


गुढीपाढवा –चैत्र 


अक्षय तृतीया-  वैशाख 


महाशिवरात्री – माघ 


होळी पौर्णिमा – फाल्गुन 


नरक चतुर्दशी – कार्तिक 


वटपौर्णिमा – ज्येष्ठ 


गोकुळ अष्टमी – श्रावण 


गणेश चतुर्थी – भाद्रपद 


दसरा – अश्विन 


मकर संक्रांत – पौष


2. निसर्गातील (वातावरण) ऋतूबद्दल तुला काय वाटते?


• उन्हाळा

हिवाळा ऋतू संपला की उन्हाळा ऋतू येतो. उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत असतो.उन्हाला ऋतूला ग्रीष्म ऋतू असेही म्हणतात.या ऋतूत ऊन जास्त असते. वातावरण खूप गरम असते. म्हणून आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, सरबत इत्यादी थंड पदार्थ घेणे आवश्यक असते.


• पावसाळा 

उन्हाळ्यानंतर पावसाळा ऋतू येतो.या ऋतूमध्ये सगळीकडे पाणीच पाणी असते.नद्या,नाले,तलाव पाण्याने भरून जातात.निसर्गात सर्वत्र हिरवेगार वातावरण असते.रस्त्याच्या बाजूला पाण्याने भरलेल्या डबक्यात मुलांना खेळायला आवडते.शेतकऱ्यांसाठी हा ऋतू खूप महत्वाचा असतो.


• हिंवाळा

हिंवाळा म्हणजे थंडीचा ऋतू.हा ऋतू ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत असतो.हिंवाळ्यात थंडी,पहाटेचे धुके यामुळे निसर्ग सुंदर दिसतो.या ऋतूमध्ये थंडीपासुन रक्षणासाठी लोकरीचे स्वेटर वापरतात.


कृती क्रमांकः


3. दिलेला योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा.


1. एका वर्षामध्ये बारा महिने असतात (वारा/बारा).


2. झेंडूच्या फुलांचा रंग पिवळा धम्मक होता (रंग/रंग).


3. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो (दिन/दीन).


4. कापड विणण्यासाठी सूत वापरतात (सुत/सूत).


5. माझ्या वेळी क्षणाचीही उसंत नसते (उसंत/वसंत).


4. शब्दांना समजून घेऊ.

(कवितेतील प्रास शब्द लिहा)


• नाती = जाती 


• लढले = पडले 


• घेणार =खाणार 


• आवार = घर 


• विकेट =क्रिकेट 


• घसा =ससा 


• बॅट = हॅट


• षटकार = चित्कार 


• बहराचा = मोहराचा 


• ऊन = चहूकडून 


• सडे = झडे 


• बारा = तऱ्हा


5. खेळूया अंताक्षरी.

विद्यार्थ्यांना त्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या शब्दांच्या आणि गाण्यांच्या सहाय्याने, योग्य ती रचना करून अंताक्षरी खेळण्यास सांगणे: त्या शब्दांची नोंद करणे. 

शब्दांची अंताक्षरी

उदा.- कोरोना-नाक-कमल-लखन- नवरा-राजा-जाई ……….


6. निसर्गाला निरखुया ! (तुइऱ्या आवडीचे निसर्ग चित्र रेखाट)

7.  काढता पाय घेणे = निघून जाणे

बाबा भावाला रागावताना पाहून मी तिथून काढता पाय घेतला.


8.मलम पट्टी करणे = जखमेवर औषधोपचार करणे

जखमी झालेल्या कुत्र्याला मलमपट्टी केली.


9.कौशल्य दाखविणे = हुशारी दाखविणे

माझ्या मित्राने खो-खो खेळत कौशल्य दाखवले.


10.हळहळणे = दुःख व्यक्त करणे

ती वाईट बातमी ऐकून आम्ही सर्वजण हळहळलो.


8. माझे घर 

1. तुमच्या घराला किती दरवाजे आहेत ?

उत्तरः आमच्या घराला ………. दरवाजे आहेत


2. तुमच्या घराला किती खिडक्या आहेत ?

उत्तरःआमच्या घराला ……..खिडक्या आहेत.


3. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे?

उत्तरःआमच्या घराचा मुख्य दरवाजा………दिशेला आहे.


4. तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत?

उत्तरःआमच्या घरामध्ये ……….सदस्य आहेत


5. तुमच्या घरातील कुटुंब प्रमुखाचे नाव सांगा.


उत्तरःआमच्या घरातील कुटुंब प्रमुखाचे नाव……………………………. आहे.


6. तुमच्या घरातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान व्यक्तीचे नाव सांग.

उत्तरःआमच्या घरातील सर्वात मोठ्या व्यक्तीचे नाव श्री………………. व सर्वात लहान व्यक्तीचे नाव ………


7. तुमच्या घरात कोणकोणते पाळीव प्राणी आहेत?


उत्तरःआमच्या घरात कुत्रा,मांजर, गाय,म्हैस…………………………… इत्यादी पाळीव प्राणी आहेत.


8. तुमच्या घरासमोरील अंगणात कोणकोणती झाडे आहेत ?

उत्तरःआमच्या घरासमोरील अंगणात गुलाब,शेवंती,अबोली,आंबा ………… इत्यादी झाडे आहेत.


9. खालील चित्र पाहून गोष्ट तयार करा.

एका जंगलात सासा आणि कासव रहात होते.एक दिवशी त्यांची शर्यत लागली. शर्यतीमध्ये ससा खूप वेगाने पुढे निघून गेला.कासव मात्र हळूहळू एका संथ गतीने जात होते.खूप पळल्यामुळे सस्याला थकला म्हणून विश्रांती घेतो व तिथेच त्याला झोप लागते. तितक्यात कासव सावकाश सावकाश पुढे जाते आणि शर्यत जिंकते.

तात्पर्य – कधीच कोणाला कमी समजू नये.


10. खालील चित्राचे निरीक्षण कर व यामध्ये तुला कोण कोणते प्राणी व पक्षी दिसतात त्यांची यादी बनव.

हत्ती माकड,हरीण,झेब्रा,चिमणी,बगळा, बदक,कासव इत्यादी..


11. शेतकरी गीत या कवितेतील लयबध्द शब्द शोधून लिही.

उदा. शेतात – गगनात.


पिकलंय – दिसतंय


शेतीला – सोबतीला


कापणीची – मळणीची


जोडूया – खपूया


डुलतय –  झालाय 


भरूया – खपूया


12. शेतकरी गीत या कवितेच्या सहाय्याने खालील ओळी पूर्ण कर.

बिगीबिगी चल जाऊ शेतात 

दिवस उगवलाय गगनात ।।धृ।। 


मिरगाचा पाऊस आलाय रं

मोत्यांचे पीक आता पिकलं रं 

जाऊया समदे शेताला 

झप झप लागुया पेरणीला ।।१।।


वाऱ्यानं शेत कसं डुलतंय रं 

धरणीला आनंद झालाय रं 

लई लई भात पिकलंय रं 

सोन्याचं शेत जणू दिसतंय रं ।।२।।

13. माझे गाव या कवितेच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा.


• गावच्या पूर्वेला काय आहे?

उत्तर – गावच्या पूर्वेला देवाचा डोंगर आहे.

• गावच्या पश्चिमेला काय आहे?

उत्तर -गावच्या पश्चिमेला कवीचे घर आहे.

• शेतमळे कोणामुळे बहरले ?

उत्तर -शेतमळे नदीमुळे बहरले

• शाळा कोणत्या दिशेला आहे?

उत्तर -शाळा दक्षिण दिशेला आहे

• शाळा आपल्याला काय सांगते ?

उत्तर -शाळा आपल्याला मन लावून शिकण्यास सांगते

• तुझ्या शाळेचे सुंदर चित्र काढ.

उत्तर –

• तुझ्या शाळेचे नाव काय ?

उत्तर – माझ्या शाळेचे नाव ………………………………………………….. आहे. 

• समानार्थी शब्द लिही.


देव = भगवान 


नदी = सरिता 


घर= सदन


आई= माता 


फुल = पुष्प 

• खाली दिलेल्या कोष्टकामध्ये काही शब्द उलटे सुलटे लपलेले आहेत हे शोधून लिही.

1. अडाणी

2. उलटे

3. चष्मा

4. पुस्तक

5. सुरात

6. काच

7. रडू

8. सदा

9. कदाचित

10.

11.

12.


*इयत्ता – चौथी*
*विषय – माय मराठी*
*सत्र – 2*
*प्रश्नोत्तरे *
**
https://www.smartguruji.in/2021/08/chouthi-prashnottare.html
*‼️9. फेसाटी सामना*
https://www.smartguruji.in/2021/12/9fesati-samana.html
*‼️10. आडाणी खेडूत*
https://www.smartguruji.in/2021/12/10adani-khedut.html
*‼️11. पत्रलेखन*
https://www.smartguruji.in/2021/12/11-11patralekhan.html
*‼️12. बारा महिने*

https://www.smartguruji.in/2021/12/12-bara-mahine.html

धन्यवाद…!!


























Share with your best friend :)