इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – भूगोल
सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार
27. कर्नाटकातील वाहतूक व्यवस्था
27.TRANSPORT SYSTEM IN KARNATAKA
1. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1) खेडयांना आणि नगरांना रस्ते जोडतात.
2) कर्नाटकामधून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाची संख्या 14 इतकी आहे.
3) बेंगळूर शहरांतर्गत रेल्वे वाहतुकीला नम्मा मेट्रो म्हटले जाते.
4)न्यू मंगळुरू बंदराला ‘कर्नाटकाचे प्रवेशद्वार’ म्हटले जाते.
5) कर्नाटकातील किनारपट्टीवरील रेल्वे मार्गाला कोकण रेल्वे असे म्हणतात.
2. गटामध्ये चर्चा करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) रस्ते वाहतुकीचे महत्त्व समजावून सांगा.
उत्तर –कर्नाटकात रस्ते वाहतूक महत्त्वाची आहे कारण ती खेडी आणि शहरांना जोडते, लोकांची आणि मालाची वाहतूक सुलभ करते.रस्ते वाहतूक परवडणारी वाहतूक आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचते, शेती, उद्योग, खाणकाम आणि वाणिज्य यासाठी उपयुक्त आहे.
2) कर्नाटकातील विविध प्रकारच्या रस्त्यांची नावे सांगा.
उत्तर – कर्नाटकातील विविध प्रकारच्या रस्त्यांचे चार प्रकार आहेत: राष्ट्रीय महामार्ग,राज्य हमरस्ते,जिल्हा रस्ते आणि ग्रामीण मार्ग.
3) कर्नाटकातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गाची यादी करा.
उत्तर – कर्नाटकातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गांमध्ये बेंगळुरू-मद्रास,कोकण रेल्वे (मंगळुरु-मुंबई) आणि दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्ग यांचा समावेश होतो.
4) हवाई वाहतुकीचे फायदे कोणते?
उत्तर – हवाई वाहतूक हा सर्वात जलद मार्ग आहे.या मार्गाने लोक,पत्र आणि हलक्या वस्तूंची विशेषत: आणीबाणीच्या वेळी जलद वाहतूक करण्यास मदत होते.पण ही वाहतूक महाग असल्याने सर्वांना उपलब्ध व परवडणारी नाही.
5) कर्नाटकातील बंदरांची नावे.
उत्तर – मंगळुरु (‘कर्नाटकचे प्रवेशद्वार’), कारवार आणि जुने मंगळुरु, मालपे आणि होन्नावर यासारखी प्रमुख बंदरे आहेत.
खालील जोड्या जुडवा
अ ब
1. सोनेरी चौपदरी सडक योजना c) N.H.-4
2. ब्रॉडगेज e) रेल्वे मार्ग
3. H.A.L. d) विमानतळ
4. बेलेकेरी a) बंदर
5. नम्मा मेट्रो b) बेंगळूर