7th SS 13.SOCIAL AND RELIGIOUS REFORMS सामाजिक आणि धार्मिक सुधारणा

7वी समाज विज्ञान 13.सामाजिक आणि धार्मिक सुधारणा

imageedit 4 3052298794

कर्नाटक राज्य पाठ्यपुस्तक मंडळ   

इयत्ता – सातवी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

विषय – स्वाध्याय 

प्रकरण 13.सामाजिक आणि धार्मिक सुधारणा

अभ्यास

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. भारताचे नवोदय पितामहअसे कोणाला
म्हणतात
?

उत्तर –राजा राम मोहन रॉय यांना नवोदय पितामहअसे म्हणतात.

imageedit 6 9656529128

2. महादेव गोविंद रानडे कोण होते?

उत्तर – महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजा चे नेते होते.

3. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

उत्तर – सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा जोतिबा फुले यांनी केली.

4. ‘उठा! जागे व्हा ! ध्येय गाठेपर्यंत थांबू नकाअसे आवाहन
कोणी केले
?

उत्तर – उठा! जागे
व्हा ! ध्येय गाठेपर्यंत थांबू नका
असे आवाहन स्वामी विवेकानंद यांनी केले.

5. डॉ. अॅनी बेझंट कोण होत्या ?

उत्तर –डॉ. अॅनी बेझंट या थिओसॉफिकल सोसायटीमधील प्रमुख नेत्या आणि
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या
1917 मध्ये
प्रथम महिला अध्यक्षा होत्या.

6. अलीगढ चळवळीचे नेते कोण होते ?

उत्तर – सर सय्यद अहमद खान हे अलीगढ चळवळीचे नेते होते.

7. श्री नारायण गुरू यानी कोणती संस्था स्थापन ?

उत्तर – श्री नारायणगुरुंनी श्री नारायण धर्मपरिपालन योगमची स्थापना केली.

टीपा लिहा.

1.स्वामी विवेकानंद: 

imageedit 9 2745294956

स्वामी विवेकानंद हे एक प्रमुख भारतीय समाज सुधारक होते.
त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांना संघटित करून
मार्गदर्शन केले.
1893 च्या शिकागो
येथील जागतिक धर्म परिषदेत त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.तेथे
वेदांच्या तत्त्वज्ञानाबाबत दिलेल्या व्याख्यानाने त्यांना जगप्रसिद्ध बनवले.
स्वामी विवेकानंदांना बाळ गंगाधर टिळक यांनी
राष्ट्रीयतेची खरे पितामहअसे म्हटले आहे.


2.स्वामी दयानंद सरस्वती: 
imageedit 14 8577203767
स्वामी दयानंद सरस्वती हे आर्य समाजाचे संस्थापक
होते.त्यांनी
वेदांकडे परत चलाअसे आवाहन केले. त्यांनी एकेश्वरवादावर जोर दिला व
मूर्तिपूजा आणि जातिव्यवस्थेसारख्या प्रथांचा निषेध केला. दयानंद सरस्वती यांनी
आंतरजातीय व विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले.


3.सर सय्यद अहमद खान: 

imageedit 16 5069132612

सर सय्यद अहमद खान हे एक प्रमुख भारतीय मुस्लिम विद्वान
आणि समाजसुधारक होते.त्यांनी भारतातील मुस्लिमांमध्ये पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार
करण्याचे प्रयत्न केले.त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली आणि
मुस्लिम समाजातील सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेसाठी कार्य केले.


4.श्री नारायणगुरु: 

imageedit 12 3080116878





श्री नारायण गुरु हे केरळमधील समाजसुधारक आणि संत
होते.त्यांनी जातीभेद नाहीसा करून सामाजिक समता वाढवण्याचे काम केले.त्यांनी
श्री.नारायण धर्म परिपालन योगम् ची स्थापना केली आणि मागास समुदायांच्या
उन्नतीसाठी कार्य केले. श्री नारायण गुरु यांनी एक देव
,एक धर्म, एक
जात असे विचार मांडले.

 

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *